Riddhapur Railway Bridge Accident: गॅस सिलिंडर आणायला गेलेल्या तरुणाचा रेल्वे उड्डाणपुलाची लोखंडी प्लेट अंगावर कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
ईश्वर भुरभुरे आणि त्यांचा मित्र प्रभू वानखडे हे दोघे दुचाकीवरून गॅस सिलिंडर घेण्यासाठी चांदूर बाजारकडे जात होते. रिद्धपूर रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून सेंट्रिंगचे काम सुरू होते. दुचाकीवरून पुलाखालून जात असताना अचानक सुमारे एक क्विंटल वजनाची लोखंडी प्लेट ईश्वरच्या थेट डोक्यावर कोसळली. या भीषण आघातात ईश्वर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Nagpur Crime : सोशल मीडियावर ओळख, फूस लावून शाळेतून पळवलं, पालकांना लेक गैरहजर असल्याचा मेसेज; अल्पवयीन मुलीवर अत्याचार
ग्रामस्थांचा संताप; अटकेची मागणी
गॅसच्या टंचाईमुळे आधीच नागरिक त्रस्त असताना, कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप जीव गेल्याने दाभेरी ग्रामस्थांनी रुग्णालयात संताप व्यक्त केला. संबंधित कंत्राटदार आणि सुपरवायझरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक ईश्वर वर्गे व वैभव घोगरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Ashok Kharat: खरात अधिकाऱ्यांना एकमेकांच्या पत्नीशी संबंध ठेवायला लावायचा; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, सरकारकडून उत्तर
तर दुसऱ्या एका घटनेत, कामठी रोडवरील ऑटोमोटिव्ह चौकाजवळील अंबुजा गोडावून परिसरात बुधवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत तीन ट्रक पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी ६ वाजताच्या सुमारास एका ट्रकला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. काही क्षणातच आग इतर ट्रकपर्यंत पसरली. सुगतनगर अग्निशमन केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यास सुरुवात केली. आगीत आशिक खान कुरैशी यांचा एमपी-२२-एच-७२२१, राजाराम यादव यांचा एमएच-४०-सीडी-२०१२ आणि सुनील बाचले यांच्या मालकीचा एमएच-४०-८०९ हे ट्रक जळून खाक झाले. नुकसानीचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.
