• Sat. Jun 6th, 2026
    Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात नवा पेच; SIT ला विशेष सरकारी वकील मिळेना, अजय मिसर यांनी दिला नकार

    Nashik News: विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी या प्रकरणातून माघार घेतल्यामुळे तपास यंत्रणेसमोर आता नवं आव्हान निर्माण झालं आहे.

    अशोक खरात प्रकरणात नवा पेच; SIT ला विशेष सरकारी वकील मिळेना, अजय मिसर यांनी दिला नकार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक : नाशिकमधील बहुचर्चित आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणाच्या न्यायालयीन लढाईमध्ये आता एक मोठा पेच निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी विशेष तपास पथकाने ज्येष्ठ विधीज्ञ आणि विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्याची विनंती केली होती. मात्र, ॲड. मिसर यांनी कामाच्या व्यापाचे कारण देत हा खटला चालवण्यास लेखी पत्राद्वारे असमर्थता दर्शविली आहे.

    ॲड. अजय मिसर हे सध्या अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडत आहेत. यामध्ये प्रामुख्याने २०११ मधील मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील कुख्यात गँगस्टर रवी पुजारी यांच्याशी संबंधित महाराष्ट्रातील सर्व खटले आणि इतर अनेक महत्त्वपूर्ण न्यायालयीन चौकशीच्या कामांचा समावेश आहे. या प्रकरणांना पुरेसा वेळ आणि न्याय देणे आवश्यक असल्याने अशोक खरात प्रकरणासाठी वेळ देणे शक्य नसल्याचे त्यांनी SIT ला पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

    विशेष सरकारी वकिलांनी या प्रकरणातून माघार घेतल्याने तपासी यंत्रणेसमोर आता नवे आव्हान उभे राहिले आहे. तूर्तास या प्रकरणाचा ताबा आणि पुढील न्यायालयीन युक्तिवाद सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

    अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी, खरातला दुसऱ्या गुन्ह्यात उद्या पुन्हा करणार हजर

    महिला लैंगिक शोषण प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरात याला पोलिस कोठडी संपल्यानंतर आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारवाडा पोलिस ठाण्यात पहिल्या महिलेने खरात याच्या विरोधात दिलेल्या तक्रारीहून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या संदर्भात त्याला आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज झालेल्या सुनावणी दरम्यान त्याला न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून उद्या दुसऱ्या गुन्ह्यात खरात याला परत कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा