Toll Rate Hike: एखाद्या वाहनाचा ‘फास्टॅग’ वैध नसेल, तर रोख दुप्पट पैसे द्यावे लागतील. मात्र, ‘यूपीआय’द्वारे पेमेंट केल्यास दंडाची रक्कम सव्वा पट द्यावी लागेल.
आजपासून हायवेवरील प्रवास महागला; टोलमध्ये मोठी वाढ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी पुणे: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) एक एप्रिलपासून टोल दरांत तीन टक्के वाढ जाहीर केली आहे. नव्या दरांची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार आहे; तसेच राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली पूर्णपणे कॅशलेस पद्धतीने करण्यात येणार आहे. पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर आणि पुणे-नाशिक महामार्गावरील टोलनाक्यांवर हे वाढीव दर लागू होतील. त्यामुळे या महामार्गांवरील प्रवास महागणार आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील टोलमध्ये प्रत्येक वर्षी तीन टक्के दरवाढ केली जाते. त्यानुसार ‘एनएचएआय’ने सर्व टोलमध्ये एक एप्रिलपासून वाढ लागू केली आहे. यामुळे प्रवास महागणार आहे; तसेच एक एप्रिलपासून आता टोलवर रोखीने पैसे स्वीकारले जाणारच नाही. त्यामुळे वाहन चालकांना ‘फास्टॅग’ सुरू आहे का, हे अगोदर तपासूनच प्रवास करावा लागणार आहे.
असा आहे कॅशलेसचा नियम
राष्ट्रीय महामार्गावर टोल व्यवहार पूर्णपणे कॅशलेस करण्याचा निर्णय ‘एनएचएआय’ने घेतला आहे. ‘फास्टॅग’ आणि ‘यूपीआय’द्वारेच टोलची रक्कम आकारली जाणार आहे. टोलवरील व्यवहार पारदर्शक आणि वेगवान होण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
नवीन टोल रक्कम
१. आनेवाडी टोलनाका
वाहन प्रकार: कार/जीप/व्हॅन – एकेरी प्रवास ८५, परतीचा प्रवास १३० वाहन प्रकार: हलकी व्यवसायिक वाहने – एकेरी प्रवास १४०, परतीचा प्रवास २१० वाहन प्रकार: बस/ट्रक – एकेरी प्रवास २९५, परतीचा प्रवास ४४५ वाहन प्रकार: जड वाहन – एकेरी प्रवास ४६५, परतीचा प्रवास ६९५ वाहन प्रकार: मोठी अवजड वाहने – एकेरी प्रवास ५६५, परतीचा प्रवास ८४५
२. इंदापूर टोलनाका
वाहन प्रकार: कार/जीप/व्हॅन – एकेरी प्रवास ७५, परतीचा प्रवास ११० वाहन प्रकार: हलकी व्यवसायिक वाहने – एकेरी प्रवास १२०, परतीचा प्रवास १८० वाहन प्रकार: बस/ट्रक – एकेरी प्रवास २५०, परतीचा प्रवास ३७५ वाहन प्रकार: जड वाहन – एकेरी प्रवास २७५, परतीचा प्रवास ४१० वाहन प्रकार: मोठी अवजड वाहने – एकेरी प्रवास ४७५, परतीचा प्रवास ६१५
३. खेड शिवापूर टोलनाका
वाहन प्रकार: कार/जीप/व्हॅन – एकेरी प्रवास १२५, परतीचा प्रवास १९० वाहन प्रकार: हलकी व्यवसायिक वाहने – एकेरी प्रवास २०५, परतीचा प्रवास ३०५ वाहन प्रकार: बस/ट्रक – एकेरी प्रवास ४२५, परतीचा प्रवास ६४० वाहन प्रकार: जड वाहन – एकेरी प्रवास ६६५, परतीचा प्रवास १००० वाहन प्रकार: मोठी अवजड वाहने – एकेरी प्रवास ८१०, परतीचा प्रवास १२२०
४. चाळकवाडी टोलनाका
वाहन प्रकार: कार/जीप/व्हॅन – एकेरी प्रवास १३५, परतीचा प्रवास २०० वाहन प्रकार: हलकी व्यवसायिक वाहने – एकेरी प्रवास २१५, परतीचा प्रवास ३२५ वाहन प्रकार: बस/ट्रक – एकेरी प्रवास ४५०, परतीचा प्रवास ६७५ वाहन प्रकार: जड वाहन – एकेरी प्रवास ४९५, परतीचा प्रवास ७४० वाहन प्रकार: मोठी अवजड वाहने – एकेरी प्रवास ८६०, परतीचा प्रवास १२९५
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा