• Sun. Jun 7th, 2026

    Maharashtra Weather: महाराष्ट्रात तीन दिवस पावसाचा अंदाज, मुंबई, पालघर, ठाण्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस; कोकणात ‘यलो अलर्ट’

    Maharashtra Weather: महाराष्ट्रात तीन दिवस पावसाचा अंदाज, मुंबई, पालघर, ठाण्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस; कोकणात ‘यलो अलर्ट’

    Mumbai Rain Alert: नाशिक, खान्देशसह पुणे, सातारा, अहिल्यानगरमध्ये सोमवारी अवकाळी पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला. यात काढणीच्या टप्प्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुढील तीन दिवस राज्याती अनेक भागांत पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: विदर्भ वगळता राज्यभरात कमाल तापमानाचा पारा सरासरीहून खाली उतरला असून, महामुंबई परिसरात मंगळवारी हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबई, पालघरमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस तर, ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याही शक्यता आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ‘यलो ॲलर्ट’ असून उत्तर महाराष्ट्र आणि पुण्यामध्ये गारा पडण्याची शक्यता असल्याने ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला आहे.

    अवकाळी पाऊस कशामुळे?

    देशात सध्या दोन पश्चिमी प्रकोप सक्रिय असून, याच्या प्रभावाखाली वायव्य भारतामध्ये ३० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत पावसाची शक्यता निर्माण झाल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले. महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गाराही पडू शकतात. सोमवारीही राज्यात काही ठिकाणी गारा पडल्याचे समोर आले. या अवकाळी पावसामुळे विदर्भ वगळता राज्यात उर्वरित केंद्रांवर कमाल तापमान उतरले होते. मुंबईत सांताक्रूझ येथे ३२.९ तर कुलाबा येथे ३३ अंश से. कमाल तापमान सोमवारी नोंदले गेले. पुणे, जळगाव, महाबळेश्वर, नाशिक, सांगली या केंद्रांवर सोमवारी एका अंशांहून अधिक फरकाने खाली उतरल्याची नोंद झाली.पुणे केंद्रावर २६.२ आणि लोहगाव केंद्रावर ३६ मिलीमीटर पावसाचीही नोंद झाली.Maharashtra TimesPune Rain : हा पाऊस आहे की काय? ऐन उन्हाळ्यात गारपीट, पुणेकरांची त्रेधातिरपीट, पिंपरी चिंचवडमध्येही तारांबळ

    मुंबईमध्ये गुरुवारपर्यंत हलका पाऊस पडेल, अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पालघरमध्येही गुरुवारपर्यंत पावसाची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये मंगळवारी सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. त्यानंतर बुधवार, गुरुवारी हलका ते मध्यम पाऊस पडू शकेल. जळगाव, नाशिक, नाशिकचा घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली येथे मंगळवारसाठी ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे.

    Maharashtra TimesJalna Rain : जालन्यात अवकाळी पावसाचं रौद्र रुप, झाडावर वीज कोसळली, 2 तरुणांचा जागीच मृत्यू

    कोकणात ‘यलो अलर्ट’

    दक्षिण कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये गुरुवारपर्यंत यलो अॅलर्ट कायम आहे. या काळात विजा, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस तिन्ही जिल्ह्यांमध्ये पडू शकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा