भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात सातत्याने गेले २५ वर्ष लढा देणारे अंनिसचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांचा संघर्ष चर्चेत आला आहे. त्यांनी एसआयटीला आता याप्रकरणात मोठी माहिती पुरवली आहे.
भोंदू कॅप्टन खरातच्या विरोधात कृष्णा चांदगुडे यांचा पंचवीस वर्षांपासून लढा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अनिकेत यादव, कोपरगाव, अहिल्यानगर: भोंदू कॅप्टन अशोक खरातचे काळे कारनामे उघड होत असताना, त्याच्या विरोधात तब्बल २५ वर्षे अखंड लढा देणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे पुन्हा चर्चेत आले आहेत. कोपरगाव तालुक्यातील चास नळी येथील चांदगुडे यांनी भीती, दबाव आणि धमक्या झुगारून दिल्या आणि भोंदूगिरीविरोधात झंझावाती लढा उभारला.
भोंदू खरातकडून अंनिसला धमक्या
१९९८ मध्ये झालेल्या पहिल्या भेटीतच चांदगुडे यांनी भोंदूच्या पायाशी न पडता त्याला थेट विरोध दर्शवला. याच धाडसामुळे त्यांचा सार्वजनिक अपमान करण्यात आला; मात्र ते डगमगले नाहीत. पुढे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते अंनिसशी जोडले गेले आणि संघर्ष अधिक तीव्र झाला. दरम्यान, २००७, २०१३ आणि २०२२ या काळात भोंदू खरातकडून अंनिसला धमक्या देण्यात आल्या. तरीही चांदगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माघार घेतली नाही.
भीतीपोटी तब्बल तीन महिने दबावात
अंनिसने दिलेल्या आव्हानानंतर एकदा तर भोंदूने भीतीपोटी तब्बल तीन महिने आपले दुकान बंद ठेवले होते. २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी दौऱ्यावर असताना, प्रोटोकॉल मोडून भोंदूच्या ठिकाणी गेल्याचा प्रकार घडला. या घटनेला चांदगुडे यांनी उघडपणे विरोध केला. प्रचंड दबाव, राजकीय दडपण असूनही त्यांनी भूमिका बदलली नाही, हीच त्यांच्या लढ्याची खरी ताकद ठरली.
Neelam Gorhe : ‘भोंदूंना भेटण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत, खरात नावाच्या व्यक्तीला भेटल्याचे आरोप कपोलकल्पित’; नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया
चांदगुडे यांनी महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली
पीडितांकडून तक्रारी येत होत्या, पण पुरावे आणि साक्ष देण्याची भीती यामुळे कारवाई अडकत होती. तरीही चांदगुडे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर भोंदू खरातवर गुन्हा दाखल होऊन अटक झाल्यानंतर, अंनिसने एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची भेट घेऊन महत्त्वाची गोपनीय माहिती दिली. विशेष म्हणजे, भोंदू कॅप्टन खरात काळी जादू आणि जादूटोण्यासाठी वन्यजीवांचा वापर करत असल्याची माहिती प्रथम चांदगुडे यांनीच पोलिसांना दिली होती. त्यांच्या मागणीनुसार वन्यजीव संरक्षण कायद्याचे कलम लावण्यात आले जे पुढील तपासात निर्णायक ठरले.
सध्या या प्रकरणाचा तपास नरबळी आणि अंधश्रद्धेच्या अंगाने सुरू असून, चांदगुडे हे अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष आहेत. ते पोलिसांना सातत्याने सहकार्य करत आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा