• Wed. Sep 16th, 2026

प्रशासकीय कामे गतीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 30, 2026
प्रशासकीय कामे गतीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर – महासंवाद

छत्रपती संभाजीनगर, (विमाका) ३०:  विभागातील  सर्व जिल्ह्यातील  प्रलंबित प्रशासकीय कामे गतीने  पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात श्री.पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज  दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

विभागातील प्रत्येक जिल्ह्यांनी मतदार यांद्याचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची (SIR) कार्यवाही जलद गतीने पूर्ण करावी.  शासनामार्फत साधना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या कालावधीत प्रत्येक विभागांनी आपल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी असलेल्या कर्मयोगी भारत संकेतस्थळावरील जास्तीत जास्त शासकीय कामकाजासाठी उपयुक्त असणारे अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यावेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जनगणनेच्या अनुषंगाने आवश्यक बाबी पूर्ण करून घ्याव्यात. विभागातील दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी व टँकरमुक्तीसाठी जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या गावांची यादी पाठवावी जेणे करून सीएसआरच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे होण्याच्या दृष्टीने मनुष्यबळ उपलब्ध करून देता येईल. यासाठी सुरेश खानापूरे यांच्या व अनुलोम संस्था या सेवाभावी संस्थांचे सहकार्य या कामासाठी घेता येईल. जास्तीत जास्त पाणी अडवून जिरविण्यासाठी आवश्यक प्रकल्पांचे प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कार्यवाही करावी. 

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेसंदर्भातील प्रलंबित कामे शासनाच्या नविन नियमानुसार पूर्ण करावीत. गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनांची जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा. सिंचन विभागाने अधिग्रहीत केलेल्या जमिनींच्या नोंदी अद्ययावत करून शासनाकडे परत घेण्यासंदर्भात पाठपुरावा संबंधित विभागाने करावा, अशा सूचनाही श्री. पापळकर यांनी यावेळी केल्या.

******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed