• Sat. Jun 20th, 2026

    Pune Crime: पुण्यात संतापजनक घटना; PMP बसमध्ये कंडक्टरकडूनच अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, प्रवाशांमध्ये संतापाची लाट

    Pune Crime: पुण्यात संतापजनक घटना; PMP बसमध्ये कंडक्टरकडूनच अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, प्रवाशांमध्ये संतापाची लाट

    PMP Bus News: मुलीने मोबाईल नंबर देण्यास नकार दिल्यानंतरही वाहकाने आपलं वर्तन सुधारलं नाही. त्यानंतर विकृताने तिला चुकीचा स्पर्श करत विनयभंग केल्याचा आरोप आहे.

    पुण्यात दोन घटनांनी उडाली खळबळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : रोजच्या प्रवासासाठी पुणे शहरात लोक ज्या व्यवस्थेवर भरोसा ठेवतात, त्या PMP बसमध्येच अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरपणे पुढे आला आहे. शहरात समोर आलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांनी नागरिकांमध्ये संताप आणि चिंता दोन्ही वाढवल्या आहेत.

    पहिली घटना कात्रज ते स्वारगेट या मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये घडली. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत बसच्या वाहकानेच गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरोपीला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान पीएमपी बसच्या वाहकाने मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करत तिला मोबाईल नंबर देण्याचा आग्रह केला. मात्र मुलीने नकार दिल्यानंतरही त्याने आपलं वर्तन सुधारलं नाही. उलट तिला अयोग्य स्पर्श करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

    या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने जोरात आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून बसमधील प्रवासी तत्काळ पुढे आले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत त्यांनी बस थांबवून आरोपीला पकडलं. मुलीकडून माहिती घेतल्यानंतर संपूर्ण प्रकार स्पष्ट झाला आणि संतप्त प्रवाशांनी आरोपीला पोलिसांच्या हवाली केलं. या प्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दाखल केली असून, आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

    सिंहगडमध्येही धक्कादायक प्रकरण समोर

    शहरातील दुसऱ्या घटनेनेही संताप व्यक्त केला जात आहे आहे. सिंहगड रस्ता परिसरात एका १० वर्षांच्या मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप ६६ वर्षीय व्यक्तीवर करण्यात आला आहे. हा प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर उघडकीस आला असून आईने तात्काळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

    दरम्यान, या घटनांमुळे नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा