Beed Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच बीड जिल्ह्यात एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.
बीड टॉवर कोसळ्याने चोरांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुनील जाधव, बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदुरघाट परिसरातून एक मोठा प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण येथून हायव्होल्टेज विजेच्या टॉवरची तार चोरी करण्यासाठी आलेल्या टोळीवर काळाने घाला घातला. टॉवरची तार काढत असताना लोखंडी टॉवरचा समतोल बिघडून तो कोसळल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मयतांचे साथीदार त्यांचे पार्थिव कारमध्ये घालून परभणीला घेऊन गेले, मात्र तिथे पोहोचताच पार्थिव सोडून त्यांनी पळ काढला.
नेमकी घटना काय?
पुणे जिल्ह्यातील चाकण (मेदनकरवाडी) येथील अविनाश पटोळे (वय १७ वर्ष), आकाश श्रीराम आडे आणि त्यांचे अन्य साथीदार काल रविवारी रोजी रात्री १२:३०च्या सुमारास सुरज गिराम याच्या इर्टिगा कारमधून नांदुरघाट परिसरातील डोंगऱ्याचीवाडी शिवारात आले होते. येथील टोरँटो कंपनीच्या हायव्होल्टेज टॉवरचे काम अद्याप प्रलंबित असून त्यात वीजप्रवाह सुरू नव्हता. याचाच फायदा घेत हे तरुण टॉवरवर चढून महागड्या तारांची चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. तारा काढत असताना अचानक टॉवरचे एका बाजूचे संतूलन ढासळले आणि अवजड लोखंडी टॉवर जोरात जमिनीवर कोसळला. या भीषण अपघातात अविनाश पटोळे आणि आकाश आडे हे दोघेही टॉवरखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. Prashant Padole Accident : एअरपोर्टकडे जाताना भरधाव ट्रकची धडक, खासदार प्रशांत पडोळेंचा भीषण अपघात; वाहनाचा चक्काचूर
पुरावा नष्ट करण्याचा बनाव
अपघात घडल्यानंतर घाबरलेल्या साथीदारांनी पोलिसांना कळवण्याऐवजी या घटनेला अपघाताचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोघांचे पार्थिव इर्टिगा कारमध्ये टाकले आणि थेट त्यांचे मूळ गाव असलेल्या परभणीकडे धाव घेतली. परभणीत पोहोचल्यानंतर, परिस्थिती अंगाशी येईल या भीतीने कारमधील इतर साथीदार आकाश पेठे, दीपक भगत आणि वैभव आदत पार्थिव गाडीतच सोडून पसार झाले. शेवटी, कारचालक सुरज गिराम याने पार्थिव रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत मृतांच्या नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी गोंधळ घातला. ही माहिती मिळताच परभणी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेऊन सुरज गिरामला ताब्यात घेतलं. Ashok Kharat : खरातच्या मोबाईलची क्लोन कॉपी मिळाली, सांकेतिक मेसेज अन् विशिष्ट स्वरुपात नावं सेव्ह, SIT च्या हाती धागेदोरे
तपास आणि पोलीस कारवाई
या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळी रक्ताचे डाग, मृतांच्या चपला आणि पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. बीड येथील फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देऊन रक्ताने माखलेली माती आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत. परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बेद्रे यांनीही केजला भेट देऊन चालकाची चौकशी केली आहे. पुण्यातून चोरीच्या उद्देशाने आलेल्या या टोळीचा नेमका मास्टरमाईंड कोण आहे? आणि यात आणखी कोणाचा हात आहे? याचा तपास आता पोलीस करत आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा