MHADA Mumbai Lottery 2026: मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, म्हाडाने तब्बल २६४० घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. आज, ३० मार्चपासून करता येणार अर्ज. शेवटची तारीख कोणती?
म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते ‘गो लाइव्ह’ कार्यक्रमातून या प्रक्रियेचा शुभारंभ केला जाणार आहे. शहरातील विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, दादर, वडाळा, पवई, माझगाव, गिरगाव या परिसरातील विविध प्रकल्पांचा समावेश सोडतीत करण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert: राज्यावर पुन्हा अवकाळी संकट! 4 एप्रिलपर्यंत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन
अत्यल्प उत्पन्न गट (ईडब्ल्यूएस) अर्थात सहा लाखांपर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्यांसाठी १४५ सदनिका, अल्प उत्पन्न गट नऊ लाखांपर्यंतच्या ८५८ सदनिका, मध्यम उत्पन्न गट १२ लाखांपर्यंतच्या १,४०८ आणि उच्च उत्पन्न गट बारा लाखांपेक्षा अधिक असलेल्यांसाठी २२९ सदनिका उपलब्ध असणार आहेत. याची अंतिम यादी १२ मे रोजी जाहीर होणार असून सोडत १५ मे रोजी सकाळी ११ वाजतापासून सुरू होणार आहे.
सदनिकांच्या विक्रीसाठी कोणतेही एजंट किंवा प्रतिनिधी नेमलेले नाहीत. नागरिकांनी फसवणूक टाळण्यासाठी केवळ अधिकृत संकेतस्थळ किंवा मोबाइल अॅपद्वारेच अर्ज करावा, असे आवाहन म्हाडाने केले आहे.
NCP Merger : महाराष्ट्राच्या राजकाणात पुन्हा दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याची चर्चा, नेमकं घडलं काय? वाचा A टू Z
अर्जाच्या महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरूः ३० मार्च २०२६ (दुपारी ३ वाजता)
अर्जाची अंतिम मुदतः २९ एप्रिल २०२६ (रात्री ११.५९)
अनामत रक्कम भरणा : ३० एप्रिल २०२६पर्यंत
प्रारूप यादी: ५ मे २०२६
हरकती/दावे : ८ मे २०२६पर्यंत
अंतिम यादी : १२ मे २०२६
सोडतः १५ मे २०२६ (सकाळी ११ वाजता)
गट -उत्पन्न मर्यादा -उपलब्ध सदनिका
अत्यल्प उत्पन्न गट (ईडब्ल्यूएस) —६ लाखांपर्यंत —१४५
अल्प उत्पन्न गट (एलआयजी) —९ लाखांपर्यंत —८५८
मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) —१२ लाखांपर्यंत —१,४०८
उच्च उत्पन्न गट (एचआयजी) —१२ लाखांपेक्षा अधिक —२२९
