• Sun. Jun 7th, 2026
    Mumbai News : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMCचा निर्णय; मूर्तिकारांना मोफत मंडप जागा, शाडू माती, ऑनलाइन परवानगी मिळणार

    मुंबईत २०२६ चा गणेशोत्सवासाठी बीएमसीने मूर्तिकारांसाठी मोठा निर्णय घेतला असून शाडूच्या मूर्ती घडविणाऱ्यांना मोफत मंडप जागा, शाडू माती आणि नैसर्गिक रंग दिले जाणार आहेत. ‘एक खिडकी’ योजनेद्वारे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

    मुंबईत पर्यावरणपूरक गणपती मूर्तिकारांना पालिकेकडून मोफत जागा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ( BMC ) मूर्तिकारांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील मूर्तिकारांना आता तात्पुरते मंडप उभारण्यासाठी महानगरपालिकेकडून विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेकडून शाडू माती आणि नैसर्गिक रंगही मोफत पुरवले जाणार आहेत.

    महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने २०२६ मधील उत्सवांचे नियोजन आतापासूनच सुरू केले असून, त्याबाबतचे विशेष परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.

    ‘एक खिडकी’ योजनेतून ऑनलाइन अर्ज सुविधा

    मूर्तिकारांना विविध परवानग्यांसाठी धावपळ करावी लागू नये, म्हणून शुक्रवार, २७ मार्च २०२६ पासून पालिकेच्या संकेतस्थळावर ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० ऑक्टोबर २०२६ आहे तर परवानगीची कालमर्यादा: २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत आहे.

    Maharashtra TimesRupali Chakankar Resign : रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, अशोक खरात प्रकरणावरून दुसरा धक्का

    प्रमुख अटी आणि सवलती

    1. प्रथम प्राधान्य: पालिकेकडे उपलब्ध असलेल्या जागेनुसार ‘प्रथम अर्जदारास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर जागा दिली जाईल.
    2. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती: ही मोफत जागेची सवलत फक्त शाडू मातीच्या किंवा पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांसाठीच असेल. तेथे ‘पीओपी’ (Plaster of Paris) च्या मूर्ती घडविण्यास सक्त मनाई आहे.
    3. मोफत साहित्य: पालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत उपलब्धतेनुसार मूर्तिकारांना शाडू माती आणि नैसर्गिक रंग विनामूल्य दिले जातील.
    4. डिजिटल प्रक्रिया: सार्वजनिक किंवा खासगी जागेवर मंडप उभारण्यासाठी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून (https://portal.mcgm.gov.in) ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे.

    नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई

    मंडप उभारताना रस्ते किंवा फूटपाथवर खड्डे खणण्यास पालिकेने प्रतिबंध केला आहे. जर एखाद्या ठिकाणी खड्डे खणल्याचे आढळल्यास, प्रति खड्डा २ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. मूर्तिकारांनी खड्डे न खणता तात्पुरत्या मंडप उभारणीच्या आधुनिक तंत्राचा वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

    Maharashtra TimesJalna News : रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, जालन्यातील घटना

    पर्यावरणपूरक उत्सवासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात असून, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे उपायुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे यांनी स्पष्ट केले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा