• Tue. Jun 16th, 2026
    Maharashtra Politics : ‘महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार’, शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांचा दावा

    शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी मोठं भाकीत वर्तवलं आहे. “महराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे. काहीतरी मोठं होणार आहे’, असे संकेत ज्योती वाघमारे यांनी दिले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड : अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजपचं ‘ऑपरेशन लोटस’ असो किंवा राष्ट्रवादी पक्षातील विभाजन, यावरून राज्याचं लक्ष वेधलं गेलं होतं. आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचे संकेत शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या तथा राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी दिले आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ किंवा ‘ऑपरेशन तुतारी’ होणार, जे पण होणार योग्य वेळी होणार असल्याचे खासदार ज्योती वाघमारे म्हणाल्या. नांदेडमध्ये संध्याताई प्रतिष्ठान तर्फे आयोजित महिलांच्या सत्कार कार्यक्रमासाठी ज्योती वाघमारे या आज नांदेडला आल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

    ज्योती वाघमारे नेमकं काय म्हणाल्या?

    मागील काही काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून दोन वेगवेगळे पक्ष झाले आहेत. पक्ष फुटीनंतर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गट आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आणखी काही खासदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकारणात सुरु आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाच्या राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी खळबळजनक दावा केला आहे. “राजकारणात काहीतरी होणार आहे. मोठा भूकंप होणार आहे. राजकारणात परफेक्ट टाईमला खूप महत्त्व असतं. तेव्हा योग्य वेळ आल्यानंतर नक्की सांगू”, असं म्हणत खासदार ज्योती वाघमारे यांनी राजकीय बॉम्ब टाकला.

    ‘खरात प्रकरण ही चीड आणणारी घटना’

    अशोक खरात प्रकरण देशभर गाजत आहे. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध केला जात आहे. राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी देखील निषेध करत राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचाऱ्याच्या घटनांवर खंत व्यक्त केली आहे. अशोक खरात या भोंदूबाबाने ज्या प्रकारे महिलांवर अत्याचार केले आहेत ते चीड आणणारे आहे. महिलेचा सन्मान करायला पाहिजे, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रलंबित असलेला शक्ती कायदा पारित करण्यासाठी आणि महिला सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार ज्योती वाघमारे म्हणाल्या. अत्याचाराच्या घटनेत नराधमाला शिक्षा व्हावी पाहिजे, मात्र चर्चेचे फोकस आपल्याकडे वळवण्यासाठी राजकारण करू नये, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.

    ‘अजित पवार प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल, मला विश्वास’

    अजित पवार यांच्या विमान अपघाताला दोन महिने पूर्ण झाले आहेत. या प्रकरणी विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याकडून देखील घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यावर ज्योती वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली. “सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या भगिनी आहेत, भावाप्रति माया कुठल्याच शब्दात वर्णन करता येत नाही. त्यांना काय वेदना होत आहेत हे मी समजू शकते. अजित पवार यांच्या संदर्भात कसं घडलं, काय घडलं, अपघात होता की घातपात, याबाबत संपूर्ण चौकशी केली जाईल, असं अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे ज्योती वाघमारे यांनी सांगितलं. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होईल”, माझा विश्वास आहे, असं खासदार ज्योती वाघमारे म्हणाल्या.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा