Chhatrapati Sambhajinagar Crime: गुन्हे शाखेचे पथक, फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथक तपासासाठी पाचारण करण्यात आले असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेला श्वास रोखून संपवलं? ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी घेतला एआयचा आधार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: दौलताबाद परिसरातील आसेगाव शिवारात अंदाजे 60 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक पाहणीत या वृद्धेची हत्या झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात असून, तिच्या कानातील दागिने ओरबाडून घेतल्याच्या खुणा दिसून येत आहेत. मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून, त्यासाठी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या आसेगावच्या शिवारात गुरुवारी सकाळी एका शेतकऱ्याला ओढ्याकाठी एक महिला मृतावस्थेत दिसली. या घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक रेखा लोंढे आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अवस्था पाहता ही केवळ दुर्घटना नसून घातपात असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.
लुटीच्या उद्देशाने हत्या?
मृत वृद्धेचा एक कान फाटलेला आढळला असून, त्यावरून तिच्या कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने खेचल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच, सदर महिलेचे तोंड दाबून तिचा श्वास रोखण्याचा प्रयत्न केल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकासह फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथकालाही तपासासाठी पाचारण करण्यात आले असून, ठोस पुराव्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सायबर विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले. त्यानुसार, सायबर ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या पथकाने एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मृत महिलेचे स्पष्ट छायाचित्र तयार केले आहे. हे छायाचित्र आता राज्यभरातील पोलीस ठाण्यांमध्ये पाठवण्यात आले असून, नागरिकांनाही मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा