NMIA Network: नवी मुंबई विमानतळावरून कॅब बुकिंगसाठीही नेटवर्क सेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना टॅक्सीचालकांना वाढीव दर द्यावे लागत होते. आता काही दिवसांत विमानतळावर नेटवर्क कनेकटीव्हीटी मिळणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अखेर प्रवाशांसाठी नेटवर्क सुविधा उपलब्ध झाली आहे. तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्यांपैकी दोन कंपन्यांकडून नेटवर्क सुरू झालं असून या आठवड्यात तिसरंही सुरू होणार आहे. यामुळे उन्हाळ्यात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच, एप्रिल महिन्यापर्यंत नागरिकांना 30 नव्या शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.
येत्या दोन-तीन दिवसांत सेवा उपलब्ध
गेल्या एका महिन्यापासून विमानतळावर एअरटेल आणि व्हीआयची नेटवर्क सेवा सुरू होणार आहे. आता काही दिवसांत जिओची सेवा सुद्धा सुरू होणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत सेवा उपलब्ध होणार आहे अशी माहिती जिओकडून देण्यात आली आहे. तसेच, व्हीआय व एअरटेलच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिन्यापासून दोन्ही नेटवर्क विमानतळावर उपलब्ध असून त्यांच्या सिग्नलची चाचणीही यशस्वी झाली आहे.Mumbai Melody Road: मुंबईतील ‘म्युझिकल रोड’वर फुल स्टॉप! आठवड्यातील 3 दिवस बंद राहणार मार्ग; 6 कोटींच्या प्रयोगाला स्थानिकांचा विरोध
नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर काही टेलिकॉम ऑपरेटर्सने विमानतळ दरमहा सुमारे 92 लाख रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे वर्षाला 44.16 कोटी इतके दर जास्त वाटत असल्यामुळे अनेक कंपन्यांनी नेटवर्क सुविधा देण्यास नकार दिला होता. विमानतळांच्या सर्व कोपर्यांमध्ये कनेकटीव्हीटी देण्यासाठी इन-बिल्डिंग सोल्यूशन (IBS) स्थापित केले असतानाही दरांवरती नेटवर्क कंपनी आहे विमानतळाची सहमती झाली नसल्याने अनेक दिवस सेवा उपलब्ध नव्हती.
दरांवर चर्चा सुरू
परंतु, आता अनेक चर्चांनंतर नेटवर्क कंपन्यांनी सहमती दर्शवली असून प्रवाशांना विमानतळावर अखंडित नेटवर्क सेवा मिळणार आहे अशी माहिती जिओच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. दरम्यान, एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार दर अद्याप निश्चित केले नसले तरी विमानतळावर सिग्नलची चाचणी पूर्ण झाली आहे.
Goregaon-Magathane Road: गोरेगाव ते मागाठाणे प्रवास 10 मिनिटांत! कोस्टल रोड-लिंक रोड जोडणारा 5.5 किमी लांब मार्ग; पालिकेचा नवा प्रकल्प
दरम्यान, एप्रिल महिन्यापर्यंत विमानतळावरील उड्डाणांची संख्या 22 वरून 78 वर जाणार आहे. आठवड्याला उड्डाणांची संख्या 1,092 वर जाणार आहे. 29 मार्चपासून ते 24 ऑक्टोबरपर्यंत या सर्व सेवा सुरू होणार आहेत. सध्या दिल्ली, गोवा, बंगळुरू आणि कोचिनसह हैदराबाद, कोलकाता, लखनौ, वारानसी आणि इंदौरसाठी विमानसेवा सुरू होणार आहेत.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा