Karad Accident News: अपघाताची माहिती मिळताच सहकारी प्राध्यापकांनी घटनास्थळासह रूग्णालयात धाव घेतली. त्यांच्या अपघाती मृत्यूने सायन्स कॉलेजवर शोककळा पसरली आहे.
सुधीर पाटील, सातारा : कराड आणि मलकापूरमध्ये बुधवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका प्राध्यापिकेसह भाजी विक्रेती महिला जागीच ठार झाली, तर १३ वर्षांच्या मुलीसह तीन महिला गंभीर जखमी झाल्या. कॉलेज सुटल्यानंतर सायंकाळी कराड बसस्थानकाकडे जात असताना दुचाकीला भरधाव डंपरने धडक देऊन फरफटत नेल्याने प्रा. सुषमा आनंदा कीर्तने जागीच ठार झाल्या. मलकापूरमध्ये दुचाकीला धडक देऊन भरधाव कार भाजी मंडईत घुसली. कारने चिरडल्याने भाजी विक्रेती महिला जागीच ठार असून तीन महिला जखमी झाल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये वनस्पतिशास्त्र विभागातील प्राध्यापिका सुषमा आनंदा कीर्तने या बुधवारी कॉलेज सुटल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकीवरून बसस्थानकाकडे निघाल्या होत्या. त्यावेळी डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर डंपरने दुचाकीसह कीर्तने यांना दहा ते बारा फूट फरफटत नेल्याने त्या जागीच ठार झाल्या. कॉलेजमधील त्या ज्येष्ठ प्राध्यापिका होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पीएचडी मिळवली होती.
दुसरीकडे, मलकापूरच्या भाजी मंडईत घुसलेल्या भरधाव कारने चिरडल्याने उषा बाळू रौंदाळे (रा. मलकापूर, ता. कराड) ही महिला ठार झाली. त्या भाजी विक्रेत्या होत्या. या अपघातात रूपाली मारुती पाटील (वय ३७, रा. काले, त. कराड), दीपाली सचिन हुलवान (वय ३८) आणि ज्ञानदा सचिन हुलवान (वय १३, सध्या रा. मलकापूर, मूळ रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली), या तीन महिला देखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
भाजी मंडईत घुसलेली कार एक महिला चालवत होती, अशी माहिती घटनास्थळावरून समजली. दुचाकीला धडक दिल्यानंतर महिलेचा ताबा सुटला आणि भरधाव कार थेट भाजी मंडईत घुसली. महिलांना उडवल्यानंतर इमारतीला धडकून कार थांबल्याने मोठा अनर्थ टळला. दोन्ही अपघातांची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा