• Mon. Jun 15th, 2026
    Ajit Pawar Case : ‘आकाश-पाताळ एक करु, कुणाचा बाप जरी असला तरी त्याचा मुर्दाही खोदून काढू’, फडणवीसांचं रोहित पवारांना आश्वासन

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रोहित पवार यांच्या आरोपांना विधानसभेत उत्तर दिलं. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात कुणी घातपात घडवला तर त्याला सोडणार नाही, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर आज विधानसभेत निवेदन मांडलं. यावेळी त्यांनी अपघात प्रकरणात आतापर्यंत काय-काय तपास झाला आणि तपासातून काय माहिती मिळाली, याबाबत सविस्तर विश्लेषण केलं. यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या आरोपांना देखील प्रत्युत्तर दिलं. त्यांनी रोहित पवारांना अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सखोल तपास करण्याचं आश्वासन दिलं. तसेच या प्रकरणात जो दोषी असेल त्याला शोधून काढू, असंदेखील आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

    “मला असं वाटतं की, आपल्या भावना तीव्र असल्यामुळे आपण काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटलात. राहुल गांधींनी आपल्याला सांगितलं की, तुम्ही कर्नाटकमध्ये जावून FIR दाखल करा. कर्नाटकमध्ये झिरो FIR दाखल झाला, ते ठिक आहे, त्यांनी नसेल सांगितलं, तुम्हाला वाटलं असेल, मी तुम्हाला सांगतो, हा झिरो एफआयआर घेण्याचा अधिकारच कर्नाटकला नाही. हे बेकायदेशीर आहे. कारण झिरो एफआयआर घेण्यासंदर्भातील नियमच असा आहे की, ज्यावेळी पीडित एफआयआर करण्याच्या परिस्थितीत नसेल त्यावेळेच झिरो एफआयआर करता येतो. अशा पद्धतीने एफआयआर घेण्याचा अधिकार कर्नाटकला नाही”, अशी भूमिका मुख्यमंत्र्यानी मांडली.

    ‘कर्नाटकने महाराष्ट्राच्या मानहानीसाठी FIR केला’, मुख्यमंत्र्यांचा आरोप

    “कर्नाटकने हे जे काही केलं आहे, हीच पद्धत ठेवली तर आमचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबईच्या पोलीस ठाण्यात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात झिरो एफआयआर नोंदवतील. माझ्या दबावापोटी समजा नोंदला गेला, तर तो झिरो एफआयआर नोंदला जाईल. याकरता झिरोप एफआयआर नाही. तुम्हाला वाटतं की FIR झाला पाहिजे, तर तुम्हाला 175 (3) अधिकार दिला आहे, त्या कायद्यानुसार तुम्हाला कोर्टात जाता येतं आणि कोर्ट एफआयआर दाखल करण्याचे आदेश देतं. कर्नाटकने राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रात तपास बरोबर सुरु नाही. कुठल्यातरी दबावात तपास सुरु आहे, अशाप्रकारे महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून FIR रजिस्टर केला आहे. खरंतर कर्नाटकमधीन पोलीस ठाण्याने तुम्हाला सांगायला हवं होतं की, ही झिरो एफआयआरची केस नाही”, असं रोखठोक मत मुख्यमंत्र्यांनी मांडलं.

    सहन करणार नाही, फडणवीसांचं आश्वासन

    “मी तुम्हाला आश्वासित करतो, तुमच्या मनात शंका ठेवू नका. आकाश पाताळ एक करु पण या केसमध्ये कुणाचा घातपात असेल, कुणाचा बाप जरी असला तरी त्याला खोदून काढू. सहन करणार नाही. कदाचित तुमच्या तीव्रतापेक्षा माझी तीव्रता कमी असेल पण ती बोथट नाहीय की, अजित दादांच्या केसमध्ये कुणी कॉन्स्परेन्सी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ. त्याचा मुर्दाही खोदून काढू एवढं तुम्हाला आश्वासन देतो. तुम्ही जे प्रयत्न करतात त्याचं माझं समर्थन आहे. मी त्या विरोधात नाही. फक्त ते प्रयत्न करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्ही तरुण आहात. इतरांची तीव्रता कमी आहे, असं तुम्ही समजू नका”, असं देवेंद्र फडणवीस रोहित पवारांना उद्देशून म्हणाले.

    “अजित दादा रोहित पवार यांचे काका होते, त्यांचे ते जास्त जवळचे असतील, पण आमचेही मित्र होते. मला तर असं वाटतं की, गेल्या पात ते आठ वर्षांत जेवढी माझ्याशी मैत्री होती तेवढी कदाचित राजकारणात फार कुणाशी असेल असं मला वाटत नाही. त्यांच्या जवळचेही ते सांगतील. त्यामुळे आम्ही कुठतेरी त्यांच्या अपघात प्रकरणात एफआयआर होऊ नये हे का करणार? आपल्याला क्रिमिनल जस्टीस सिस्टीममध्ये नियमानुसार काम करावं लागतं. FIR होतो ना, उदाहरणार्थ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कुणी बुक्की मारली तर FIR होऊन जाईल. कारण ते हर्ट आहे. हा अपघात असल्याने आधी ADR होतो, हा ADR च नंतर FIR मध्ये कनवर्ट होतो. त्याची प्रोसेस चालली आहे”, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा