रोहित पवारांच्या आरोपांना सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर काय-काय कट कारस्थान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधात आखण्यात आले होते त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे असल्याचं म्हणत सुनील तटकरे यांनी रोहित पवारांना इशारा दिला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. रोहित पवार यांनी सुनील तटतरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले. या दोन्ही नेत्यांना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर पक्ष ताब्यात घ्यायचा होता, असा आरोप रोहित पवारांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर काय-काय घडामोडी घडल्या याबाबत आपल्याकडे संपूर्ण माहिती आहे. अजित पवारांच्या अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या विरोधात काय-काय कट कारस्थान रचले गेले याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आहे, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.
“अजित पवार हयात असताना त्यांच्या विरोधात कट कारस्थान झाले, आज तीच कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि आमच्या पक्षाच्या विरोधात केला जातोय. तो नक्कीच जनता हाणून पाडेल आणि पक्षाचे प्रमुख नेतेही हाणून पाडतील. एवढंच मला त्यांनी जे सांगितलं आहे त्यावर मला भूमिका मांडायची आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले.
‘मला अनेकदा टार्गेट केलं’
“अजित दादा असतानाही मला अनेकदा टार्गेट केलं गेलं. 2014 पासून ते वाढत गेलं. पण आम्ही सगळ्यांनी अजित दादांना सावली सारखी साथ दिली. स्वभाविकपणे अजित दादांची उंचावलेली प्रतिमा आणि त्यांच्या महनेतीतून पक्षसंघटनेत पकड मिळवली होती. त्यामध्ये आमचा सहभाग असल्याने आम्हाला टार्गेट करणं स्वभाविक आहे. त्यामुळे मला काही वाटतच नाही. कारण NDA मध्ये सहभागी होण्याच्या निर्णय घेतला तेव्हा आम्ही अजित दादांच्या सोबत होतो. विलीनीकरणाच्याही बाबतीत त्यांना ते वाटत होतं”, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.
सुनील तटकर यांचा रोहित पवारांना मोठा इशारा
“अजित दादांच्या विमान अपघातानंतर त्यांचे पार्थिव रुग्णालयात आलं, त्यानंतर पोस्टमार्टम झालं, तिथपासून काय-काय घडलंय, या सगळ्यांची माहिती माझ्याकडे आहे. कृपा करा आणि थांबा. नाहीतर मला पुढच्या काही काळात स्पष्ट बाबी सांगाव्या लागतील. तुम्ही सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांच्या विरोधात काय कट कारस्थान करत होता याची आमच्याकडे इत्यंभूत माहिती आहे. थांबा जरा. शेवटी सुसंस्कृत विचारातून आपल्याला वाटचाल करायची आहे”, असं म्हणत सुनील तटकरे यांनी रोहित पवारांना इशारा दिला.
“मधल्या काळात रोहित पवारांनी संबंध महाराष्ट्राचा फार मोठा दौरा काढला होता. प्रचंड खर्च आणि प्रसिद्धी मिळवून हा दौरा काढला होता. पण आमच्या युवक संघटनेचा जिल्हाध्यक्ष गेला तर अनेक माणसं जमू शकतात इतकी आमची ताकदवान कार्यकर्ते आहेत. त्यांनी इतका गाजावाजा करत, प्रचंड खर्च करत जो दौरा झाला तो फ्लॉप शो झाला. अनेक बाबतीत झाले, त्यामुळे अस्वस्थ मने आहेत, त्यातून कावीळ झाल्यासारखे वक्तव्ये करण्याचा प्रयत्न होत आहेत”, अशी खोचक टीका सुनील तटकरे यांनी केली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा