Mumbai Heatwave 24 March: मुंबईत सोमवारी तापमानात 3-4 अंशांनी वाढ नोंदवण्यात आली. गेल्या आठवड्यात पावासामुळे उतरलेले तापमान आता परत चढले आहे. हवामान विभागाने शहरात उष्णता वाढेल असा अंदाज वर्तवला आहे.
सोमवारी तापमानात 3 अंशांनी वाढ
मुंबईत सांताक्रूझ येथे सोमवारी ३६.५ तर कुलाबा येथे ३४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. रविवारीही सांताक्रूझ येथे ३६.४ तर कुलाबा येथे ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. सातत्याने दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये ३६ अंशांहून अधिक कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील सोमवारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ३.७ अंशांनी तर कुलाबा येथील कमाल तापमान सरासरीपेक्षा ३.३ अंशांनी अधिक होते.
Prabhadevi Bridge: प्रभादेवीमध्ये उभारणार ‘डबल डेकर पूल’, 100 वर्ष जुन्या रेल्वे पुलाचं पाडकाम निम्म्यावर; शिवडी-वरळी कनेक्टर’ला वेग
राममंदिर, विक्रोळी आणि विद्याविहार येथील केंद्रांवरील तापमान सोमवारी सांताक्रूझपेक्षाही अधिक होते. राम मंदिर येथे ३९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले तर विक्रोळी येथे ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विद्याविहार येथे ३६.८, दहिसर येथे ३५.४, चेंबूर येथे ३५.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. दिवसभरात कुलाबा येथे ५७ टक्के तर सांताक्रूझ येथे ४३ टक्के आर्द्रता नोंदली गेली. मंगळवारीही मुंबईसह ठाणे, रायगड येथे उष्ण वातावरण जाणवू शकते. उर्वरित महाराष्ट्रात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रात सोलापूरात मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
Uttan-Virar Sea Linkमुळे मरिन ड्राइव्ह ते विरार जोडणी, अटल सेतूपेक्षा लांब सागरी मार्ग; 30 मिनिटांत होणार अंतर पार
तापमान वाढीचं कारण काय?
दरम्यान, हवामान विभागाने सोमवार आणि मंगळवारी उष्ण आणि दमट वातावरणाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान तज्ज्ञ अथ्रेया शेट्टीच्या मते उष्णतेची लाट जास्त काळ राहण्याची शक्यता कमी आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांमुळे वातावरणात थोडा गारवा जाणवत होता. समुद्रात निर्माण झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ही स्थिती निर्माण झाली. पण 20 मार्च रोजी हे वारे पुढे सरकल्याने तापमानात परत वाढ व्हायला सुरुवात झाली.
