• Sun. Jun 7th, 2026
    साताऱ्यात पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश, भाजपला शेवटपर्यंत थांगपत्ता नव्हता, फडणवीसांची नाराजी

    Satara News : सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू असल्याचे समजते. आधी चौकशी व्हावी आणि मग कारवाई व्हावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, सातारा : सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाच्या निर्देशांमागे पडद्याआडून घडलेल्या गोष्टींचा भाजपला पत्ताच नव्हता, अशी माहिती आता पुढे आली आहे. राज्यातील भाजप नेतृत्वाकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.

    शेवटपर्यंत भाजपला थांगपत्ता नाही

    विधान परिषदेत सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून देण्यात आले. त्यावर सभागृहात उपस्थित असलेले वनमंत्री गणेश नाईक तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारकडून या कारवाईला मान्यताही दिली. मात्र, हे सर्व अशा घाईघाईत झाले की याचा शेवटपर्यंत भाजपला थांगपत्ता लागला नाही.
    Maharashtra TimesNagpur Crime : 24 वर्षीय मुलाच्या मित्राशी 48 वर्षीय आईचे अनैतिक संबंध, घरातून पळाले, नागपुरातील गावात चर्चा, दृष्टीहीन पतीचा टोकाचा निर्णय

    शिवसेना-राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात आक्रमक

    सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षात मतमतांतरे होती. अशावेळी बहुमत नसतानाही भाजपने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. मात्र, या निवडणुकीदरम्यान पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत मंत्री शंभुराज देसाई यांना दुखापत झाली. त्याचसोबत मंत्री मकरंद पाटील यांच्यासोबतही पोलिसांची झटापट झाली. यावरून विधान परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात आक्रमक झाले.

    Shiv Sena Vs BJP | साताऱ्यातला संघर्षामुळे भाजप शिवसेनेत वादाची ठिणगी, विरोधकांनीही संधी साधली

    भाजपला आश्चर्याचा धक्का

    उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांच्या निलंबनाचे निर्देश दिले. सभागृहात उदय सामंत आणि गणेश नाईक हे दोन्ही मंत्री उपस्थित असल्याने त्यांना सरकार म्हणून या कारवाईचे समर्थनही केले. मात्र या निलंबनाबाबतची माहिती भाजपला उशिरा कळाल्याचे समजते. साताऱ्यामध्ये जिल्हाध्यक्ष भाजपचा बसल्याने पोलिसांच्या कारवाईला पक्षाकडून अप्रत्यक्षरित्या समर्थन असल्याचे समजते. अशा परिस्थितीत पोलिसांवरच अशाप्रकारची कारवाई झाल्याने भाजपलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. Maharashtra TimesMumbai News : मालिकेच्या शूटवरुन येताना अपघात, अभिनेत्याच्या मृत्यूप्रकरणी मुंबईत पाच डॉक्टरांवर गुन्हा, पायावरील शस्त्रक्रिया भोवली

    शिवसेना-भाजप दुफळी

    ही कारवाई आता मागे घेण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू असल्याचे समजते. शिवसेनेच्या मंत्र्यांनाच पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्यामुळे पोलिस अधीक्षकांवर कारवाई व्हायलाच हवी अशी त्यांची मागणी आहे, तर या प्रकरणात आधी चौकशी व्हावी आणि मग कारवाई व्हावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून होत आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा