Pune Accident News : पुणे-नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
क्षणार्धात कुटुंब उद्ध्वस्त
या अपघातात मल्लिकार्जुन शिवराज आंबेगावे, त्यांची पत्नी आरती मल्लिकार्जुन आंबेगावे आणि सासू लता बाळू तुपलोंढे यांचा जागीच मृत्यू झाला. तर १५ आणि १६ वर्षांची मुलगा आणि मुलगी या अपघातातून बचावले असले तरी त्यांची प्रकृती गंभीर असून मंचर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही दुर्दैवी घटना काल रात्री साडे अकराच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील एकलहरे परिसरात घडली. या ठिकाणी यापूर्वीही अनेकदा अपघात झाले असून हा मार्ग पुन्हा एकदा धोकादायक ठरत असल्याचं समोर येत आहे. आनंदाने घराकडे निघालेल्या या कुटुंबावर काळाने अचानक घाला घातला आणि एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. या घटनेमुळे आंबेगावे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Jalna Crime : स्पर्धेत क्षुल्लक कारणावरुन वाद, १५ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाला संपवलं; संसार फुलण्याआधीच कोमेजला
एकाच कुटुंबातील चौघांचा भयंकर अंत
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा जवळील गणेशपूर शिवारात रविवारी सायंकाळी भीषण अपघातात झाला असून या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत अन्य चौघे जखमी झाले आहेत. स्विफ्ट डिझायर कार क्र. एमएच १२ जीएफ ६२५९ हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथून मंठा दिशेने जात होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स क्र. एमएच २० डीडी ७६६६ ने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार रस्त्यापासून सुमारे ५० ते ६० फूट फेकली गेली. अपघातात कारचा अक्षरशः चक्कचूर झाला आहे. कारमधून सय्यद अजहर सय्यद महमूद हे आपल्या कुटुंबीयांसह मंठा येथील आपल्या बहिणीला भेटण्यासाठी निघाले होते, पण बहीण भावाची भेट या अपघाताने होऊ शकली नाही.
