अशोक खरातचे पाय आता दिवसेंदिवस आणखी खोल जाताना दिसत आहेत. अशोक खरात याचे अनेक कृत्य आता समोर येऊ लागले आहेत. त्याची SIT कडून सखोल चौकशी सुरु आहे. या दरम्यान त्याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील FIR मध्ये फिर्यादीने आरोपी अशोक खरात याच्या विरोधात अनेक धक्कादायक दावे केले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. अशोक खरात याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील FIR मध्ये फिर्यादीकडून जे दावे करण्यात आले आहेत ते धक्कादायक आहेत. अशोक खरात महिलांवर अत्याचार करायचा याचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. पण या व्यतिरिक्त तो काय-काय करायचा? याबाबत नव्याने दाखल झालेल्या FIR मध्ये फिर्यादीकडून अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. आरोपी अशोक खरात हा धार्मिक विधी आणि भविष्य बघण्याच्या नावाखाली अघोरी कृत्य करायचा. तो बाजारात रानटी चिंचोके 100 रुपयात 1 किलो घ्यायचा आणि त्याच्याकडे आलेल्या भाविकांना तो 1 चिंचोका मंत्रुन 10 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत द्यायचा, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
“अशोक खरात हा 5 इंच जाड आणि वेगवेगळ्या लांबीच्या आकाराची प्लास्टीकची पन्नी, नकली कापडी वाघ, नकली प्लास्टीकचा साप मार्केटमधून आणायचा. त्यानंतर प्लास्टीकच्या पन्नीचा नकली साप बनवून तो साप, तसेच बाजारातून आणलेले नकली साप, कापडी वाघ मिरगाव येथील ईशानेश्ववर मंदिरात ठेवायचा. तिथे तो येणाऱ्या भाविकांना घाबरवून आणि अघोरी कृत्य करुन त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा. या मंदिरात मोठमोठी माणसं यायची. बाबा या लोकांसोबत पूजा करायचा आणि त्याची व्हिडीओग्राफी करुन घेत असे”, असा दावा FIR मध्ये करण्यात आला आहे.
ब्लॅक पैसा व्हाईट करण्याचा आरोप
“अशोक खरातने मिरगाव येथे ईशानेश्वर मंदिर बांधले असून ईशानेश्वर महादेन मंदिर शिवनिका संस्थान मिरगाव या नावाचे ट्रस्ट स्थापन केले. त्या ट्रस्टच्या बॅक खात्यावरच अशोक खरात क्लाईंटचे पैसे घ्यायचा. खरातने स्वत:च्या नावावर अमाप संपत्ती गोळी केली. तसेच त्याने मंदिर ट्रस्टच्या बँक खात्यांचा आणि स्वत:च्या बँक खात्यांचा वापर ब्लॅकचा पैसा व्हाईट करण्यासाठी केला”, असाही आरोप फिर्यादीकडून करण्यात आला आहे.
‘महिलांवर अत्याचार मग जीवे मारण्याची धमकी द्यायचा’
“अशोक खरात याचं सर्वात भयानक कृत्य म्हणजे तो महिलांवर विधीचे कारण सांगून अत्याचार करायचा. तो महिलांना गुंगीकारक पदार्थ खाण्यास प्रवृत्त करायचा तसेच गुंगीकारक द्रव्य पिण्यासाठी द्यायचा. त्यानंतर तो महिलांवर अत्याचार करायचा. तसेच अत्याचार केल्यानंतर तो त्या महिलांना जीवे मारण्याची धमकी द्यायचा”, असा आरोप FIR मध्ये फिर्यादीकडून करण्यात आला आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा