Ashok Kharat Arrested : नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या अटकेनंतर दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत.
नेमकं काय घडलं?
कॅप्टन खरात ऑपरेशन राबविताना पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती. ही संपूर्ण कारवाई इतकी गोपनीय होती की, या कारवाईदरम्यान सहभागी असलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांनाही आपण नेमकं कोणाला पकडण्यासाठी जात आहोत? याची पुसटशी कल्पना देखील नव्हती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगून पोलिसांची 5 पथक तयार करण्यात आली होती. हातात लाठ्या आणि हेल्मेट परिधान करून मोहिमेत सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोहिमेच्या शेवटपर्यंत माहिती नव्हती. ज्याठिकाणी ही कारवाई करायची होती त्याठिकाणी पोहोचल्यावर ‘चोर शिरल्याचा बनाव’ करत पोलिसांनी सापळा रचला आणि अचानक अशोक खरात उर्फ कॅप्टन याला ताब्यात घेतलं.
Jalna News : लग्न होत नसल्यानं नैराश्यात, तरुणाचं टोकाचं पाऊल; कर्ता लेक गेल्यानं कुटुंबासह गावात हळहळमहत्वाची बाब म्हणजे या प्रकरणी एफ.आय.आर लिहून घेणारे अधिकारी हे देखील या अटकेच्या प्रक्रियेपासून मुद्दामून दूर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. अचानक पोलिसांनी त्याला ताब्यात घेताच आणि पोलिसी खाक्या दाखवताच, खरात हा भोंदू बाबा संतापला होता, ‘तुम्ही घोर अपराध करत आहात, तुमच्यावर कोप होईल’, असं म्हणत शाप दिला आणि त्याने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र,अत्यंत गोपनीय पद्धतीने राबवलेल्या या ऑपरेशनमुळे कॅप्टन खरात याला सावरण्याची संधी देखील मिळाली नाही.
Sunetra Pawar: रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप, राजीनामा दिला, आता पुढे काय? वादंगावर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया
मंत्री छगन भुजबळांची खरात प्रकरणी प्रतिक्रिया
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं की, ‘जर अशा प्रकारे कोणी म्हणत असेल की, संपूर्ण पोलीस यंत्रणेवर कोप होईल. मंत्र-तंत्राचा वापर करून जर शासन उलथून टाकता आलं असतं, तर आज देशातील अनेक शासनांची रोज उलथापालथ झाली असती’, अशी मिश्किल प्रतिक्रिया मंत्री भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये बोलताना दिली आहे. ‘मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही’, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
