Maharashtra Politics : शिवसेना व राष्ट्रवादीतील काही सदस्यांनी ऐन वेळी बाजू बदलली, तर राष्ट्रवादीच्या काही सदस्यांवर तक्रारी नोंदवून पोलिसांकडून रात्री गुन्हा दाखल केल्याचीही माहिती आहे
तीन मतांनी भाजपला सत्ता
जिल्हा परिषदेत भाजपचे २७, राष्ट्रवादी काँग्रेसचे २० आणि शिवसेनेचे १५ सदस्य निवडून आले आहेत. बहुमतासाठी ३३ सदस्यांची गरज होती. परंतु त्यातही अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपला ३३ मते मिळाली, तर विरोधी राष्ट्रवादी व शिवसेनेला ३० मतांवर समाधान मानावे लागले. तीन मतांनी भाजपने सत्ता मिळवली.
Ashok Kharat : चोर आलेsss अशोक खरातच्या ‘तृप्तबाला’ बंगल्याबाहेर पोलिसांचं सोंग, ‘भोंदू कॅप्टन’ डोळे चोळत अर्धवट कपड्यात बाहेर, खाकी वर्दीने गराडा घातला
शिवसेना व राष्ट्रवादीतील काही सदस्यांनी ऐन वेळी बाजू बदलली, तर राष्ट्रवादीच्या काही सदस्यांवर तक्रारी नोंदवून पोलिसांकडून रात्री गुन्हा दाखल केल्याचीही माहिती मिळते. त्यामुळे त्यांना पोलिसांनी जिल्हा परिषद परिसरातून ताब्यात घेतल्याची चर्चाही होती. परिणामी भाजपला आवश्यक संख्याबळ मिळाले.
Satara ZP Election | शंभूराज देसाईंना ज्याची धास्ती तेच घडलं, ‘ऑपरेशन लोटस’मुळे सातारा ZP हातून गेली
शंभुराज देसाईंच्या हाताला दुखापत
दरम्यान, या सर्वांत राजकीय वातावरण तापलेले असतानाच पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हाताला दुखापत झाल्याची घटना घडली. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडताना त्यांच्या उजव्या हाताला पट्टी बांधण्यात आल्याचे दिसून आले. ही दुखापत नेमकी कशामुळे झाली याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नाही.
Ashok Kharat : लॅपटॉपमधून CCTV फूटेज काढले, खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवला पोलीस संरक्षण; तरुणीच्या पोटावर उपकरण फिरवल्याचाही व्हिडिओ
दरम्यान, ही धक्काबुकी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा आरोप पालकमंत्री देसाई यांनी केला. ‘गर्दीत मला नेमका धक्का कसा लागला हे सुरुवातीला समजले नाही. मात्र, जेव्हा हाताला जखम होऊन रक्त येऊ लागले तेव्हा दुखापतीची जाणीव झाली. भाजपने सुरुवात केली आहे आता शेवट आम्ही निश्चित करू.’ अशी प्रतिक्रिया पालकमंत्री देसाई यांनी व्यक्त केली.
