Mumbai Local Train Mega Block Update: ब्लॉकवेळेत रेल्वेरुळांसह सिग्नलची देखभाल, दुरुस्ती केली जाते. यामुळे काही लोकलफेऱ्या रद्द राहणार असून काही विलंबाने धावणार आहेत.
पश्चिम रेल्वे
स्थानक – वसई रोड ते विरार
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.१५ ते रविवारी पहाटे ४.१५
Rupali chakankar: रुपाली चाकणकरांचं महिला प्रदेशाध्यक्षपदही जाणार? प्रफुल्ल पटेलांचे स्पष्ट संकेत
प्रभादेवी पूल पाडण्यासाठी विशेष ब्लॉक
स्थानक – प्रभादेवी
मार्ग – शनिवारी मध्यरात्री १.३० ते रविवारी पहाटे ६पर्यंत
परिणाम – वसई रोड ते विरार आणि प्रभादेवी पूल पाडण्यासाठी घोषित केलेल्या ब्लॉकवेळेत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. प्रभादेवी स्थानकातील रेल्वे उड्डाणपुलाचे गर्डर हटवण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीनंतर १.३० ते रविवारी सकाळी ६पर्यंत कामे करण्यात येणार आहे. चर्चगेट ते प्रभादेवीदरम्यान माटुंगा रोड आणि माहीम स्थानकात लोकल उपलब्ध राहणार नाही. (०९१८४) वाराणसी-मुंबई सेंट्रल, (२२९४६) ओखा-मुंबई सेंट्रल, (१२९२८) एकता नगर-दादर, (१२९०२) अहमदाबाद-दादर, (०९०५२) भुसावळ-दादर, (२२९५३) मुंबई सेंट्रल-अहमदाबाद या मेल-एक्स्प्रेस ३० मिनिटे ते दोन तासांपर्यंत विलंबाने धावणार आहेत.
Rupali Chakankar Resignation : राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, ‘खरातला गुरु मानलं, आरोपीवर कठोर कारवाई व्हावी’
ट्रान्स हार्बर
स्थानक – ठाणे ते वाशी/नेरूळ
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
परिणाम – ठाणे ते वाशी नेरूळदरम्यान अप आणि डाउन लोकलफेऱ्या रद्द राहणार आहेत.
शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत
ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक तीन-चार, डोंबिवलीतील फलाट क्रमांक एक ए, एक व दोन यांच्या विस्तारासाठी शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.
