• Fri. Jun 19th, 2026
    Pune Crime : पुण्यातील सोसायटीत गेटवर राडा, प्रवेश नाकारल्याने वॉचमनवरच काठीने हल्ला

    पुण्यातील एका सोसायटीत वॉचमनवर हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या वॉचमनला काही संशयास्पद गोष्टी आढळल्यानंतर त्याने दोन जणांना अडवलं. पण त्यानंतर दोघांनी वॉचमनवर काठीने हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : हडपसर परिसरातील मोहम्मद वाडी येथे एका सोसायटीच्या गेटवरच मारहाण करण्यात आली आहे. दारूच्या नशेत असलेल्या दोन व्यक्तींनी सोसायटीत प्रवेश नाकारल्याचा राग मनात धरत वॉचमनवर काठीने हल्ला चढवला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेसातच्या सुमारास दोन जण दारूच्या नशेत सोसायटी गेटवर आले. त्यांची अवस्था संशयास्पद वाटल्याने वॉचमनने त्यांना आत जाण्यापासून रोखले. तसेच गेटसमोर न थांबता बाजूला जाण्यास सांगितले. यावरून दोघे संतापले आणि त्यांनी वॉचमनशी वाद घालायला सुरुवात केली.

    काही क्षणांतच हा वाद वाढला. नशेत असणाऱ्या दोघांनी शिवीगाळ करत हातातील बांबूने मारहाण करायला सुरुवात केली. काही नागरिकांनी वाद थांबवायचा प्रयत्न देखील केला. मात्र नशेत असलेल्या एका व्यक्तीने हातातील काठी उचलून वॉचमनवर हल्ला केला. या घटनेत डोक्यावर आणि शरीरावर वार केल्याने वॉचमन जखमी झाला.

    अचानक झालेला गोंधळामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही लोकांनी पुढे येत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींचा आक्रमकपणा वाढतच गेला. या मारहाणीचा संपूर्ण प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही या गंभीर घटनेची दखल घेतली आहे.

    काळेपडळ पोलीस ठाणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे सोसायटी सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

    दरम्यान, प्रामाणिकपणे काम करणे हा गुन्हा आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. संबंधित सोसायटीतला सुरक्षा रक्षक हा आपलं काम करत होता. सुरक्षा रक्षक म्हणून काम करताना कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळल्यास त्या प्रकरणी तपास करणं किंवा त्याचा पाठपुरावा करणं हे त्या सुरक्षा रक्षकाची जबाबदारी आहे. तसेच संशयास्पद गोष्टींची माहिती पोलिसांना देण्याचं काम सुरक्षा रक्षक करतात. पण पुण्यातल्या या घटनेत आपलं काम चोखपणे पार पाडणाऱ्या सुरक्षा रक्षकालाच मारहाण झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आले आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा