Goregaon-Mulund Link Road: लिंक रोडमुळे मुंबई पूर्व ते पश्चिम वाहतूक कोंडी फुटणार आहे. नाहूर ते ऐरोली उड्डाणपूल तयार झाला तर ठाणे, मुलुंड, ऐरोली मार्गांवरील प्रवाशांना फायदा होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात कामांना वेग
सध्या तिसऱ्या टप्प्यात जुळ्या बोगद्यांसाठी टनल बोरिंग मशीन उतरवण्याचं काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत हे संपूर्ण यंत्र खाली उतरवून ते जोडण्यात येईल. त्यानंतर खोदकाम सुरू करून शहरातील सर्वात लांब भुयारी बोगदे तयार होतील. हे बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जातील आणि मुंबईतील पूर्व ते पश्चिम जोडणीला चालना देतील. गोरेगाव ते मुलुंडदरम्यान प्रवास सोपा होणार असून शहरातील वाहतूककोंडी फोडणे शक्य होणार आहे.
Pune-Nashik Highway: मुंबई-पुण्यानंतर पुणे-नाशिक महामार्गावर 4 ‘मिसिंग लिंक’; चाकण-तळेगाव-शिक्रापूर मार्ग होणार कोंडीमुक्त
दरम्यान, चौथ्या टप्प्यात नाहुर ते ऐरोली उड्डाणपुलाचं काम करण्यात येणार आहे. हा उन्नत मार्ग 1.33 किमी लांब असून हा लिंक रोडवरील गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहे. हा उड्डाणपूल पूर्वीच्या ऐरोली उड्डाणपुलावरून जाणार असून, पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी कमी होणार आहे. यामुळे नाहूर, ऐरोली, ठाणे आणि दक्षिण मुंबईदरम्यान फ्री कनेकटीव्हीटी मिळणार आहे. या प्रकल्पात ऐरोली उड्डाणपुलावरून एख केबल स्टेड ब्रिज उभारण्यात येणार आहे. नाहूरच्या रेल्वे पूलावरून हा पूल सुरू होणार आहे.
कसा असेल अंतिम टप्पा?
दरम्यान, फेझ 4 मधील दुसऱ्या टप्प्यात क्लोव्हरलीफ लूप तयार केले जाणार आहेत. मुंबईत पहिल्यांदाच कोणत्या मार्गावर असे लूप तयार होणार आहेत. हे लूप 3.6 किमी लांब बायपासवर बांधण्यात येतील. ठामे-नाहूर, ऐरोली-ठाणे, आणि मुंबई-ऐरोलीदरम्यान प्रत्येकी दोन इंटरजेंज बांधण्यात येणार आहेत.
Mumbai News: सल्लागाराने तीनदा पैसे वाढवले! मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या खर्चात 58 कोटींची वाढ; कामावर नगरसेवकांचे प्रश्नचिन्ह
आता चौथ्या व अंतिम टप्प्यांच्या कामालाही वेग मिळेल अशी अपेक्षा आहे. गोरेगाव-मुलुंड लिकं रोडचा पहिला टप्पा 2026मध्ये सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. या मध्ये दादासाहेब फाळके फिल्मसिटी ते दिंडोशी न्यायालयापर्यंत उड्डाणपुलाचा समावेश आहे. जूनपासून तिसऱ्या टप्प्यातील बोगद्यांचं खोदकाम सुरू करणार आहेत. हे काम सुरू होताच 21 महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे मार्च 2028पर्यंत पहिला बोगदा, जून 2028पर्यंत दुसरा बोगदा आणि लाईट, साइन सर्व काम पूर्ण करून डिसेंबर 2028पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट आहे.
