• Fri. Mar 20th, 2026
    निवडणुका आणि सहानुभूती दोन वेगळे मुद्दे, बारामती-राहुरीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचे काँग्रेसचे संकेत

    Maharashtra Politics : बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित असून राहुरीत दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांचे नाव चर्चेत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, पुणे : ‘राज्यात या अगोदर झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसविरोधात उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्याठिकाणी काँग्रेस विजयी झाले असून निवडणुका आणि सहानुभूती हे दोन वेगळे मुद्दे आहेत. अजित पवार यांचे अकाली व अपघाती निधन ही दुख:द घटना आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकांसदर्भात त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यानंतर उमेदवार उभा करायचा की नाही, याचा निर्णय घेऊ’, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी घेतली.

    महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी यांसह देशभरातील आठ ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर बारामतीत, तर शिवाजी कर्डिले यांच्या मृत्यूमुळे राहुरीत पोटनिवडणूक होत आहे.
    Maharashtra TimesIndore Fire : इलेक्ट्रिक कार चार्ज करताना आग, एकामागून एक सिलेंडर फुटले, कुटुंबातील सात जणांचा मृत्यू, डिजिटल लॉकमुळे कोंडी
    ‘बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक एकाचवेळी होणार आहे. दोन्ही जागा नेत्यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या आहेत. सामंजस्याने दोन्ही ठिकाणची उमेदवारी बिनविरोध करावी,’ असे आवाहन याआधीच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले होते. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित आहे. राहुरीत दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांचे नाव चर्चेत आहे.

    Sunetra Pawar : अजित दादांविषयी बारामतीकरांना मी काय सांगणार.. भाषणादरम्यान सुनेत्रा पवार भावुक

    भोंदूबाबा प्रकरणीही भाष्य

    राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी बुधवारी गांधी भवन येथे हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात अटक प्रकरणाबाबतही सपकाळ यांनी टिप्पणी केली. ‘खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले, परंतु हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम बापू आहे. आसाराम बापू, रामरहीम यांनी जे केले तेच या अशोक खरातने केले असून केवळ ५८ व्हिडीओ नाही, तर सखोल चौकशी केली तर शेकडो व्हिडीओ उघड होतील’, असे ते म्हणाले.
    Maharashtra TimesPune Friends Death : लेह-लडाखहून परत येताना काळाचा घाला, पुण्यातील तीन मित्रांचा अपघाती अंत, विमानाने परतलेला दोस्त धक्क्यात
    ‘महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाला कठोर शिक्षा तर झाली पाहिजे अशी मागणी करून आजपर्यंतचे त्याचे कारनामे पाहता त्याला कोणाचा तरी राजकीय आशीर्वाद असला पाहिजे, त्याच्या मागे ही कोणती राजकीय शक्ती आहे, ते महाराष्ट्राच्या नागरिकांना समजले पाहिजे’, असेही ते म्हणाले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा