Bhimashankar Temple: पुण्यातील भीमाशंकर मंदिर पुरातत्वच्या कामांमुळे काही काळ बंद ठेवण्यात आले आहे. अशा वेळी भाजप खासदार निशिकांत दुबेंना व्हिआयपी दर्शन देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
महाशिवरात्रीला कडक निर्बंध
गेल्या काही महिन्यांपासून भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. महाशिवरात्रीसारख्या मोठ्या सणाच्या काळातही गर्दीचे नियोजन लक्षात घेऊन मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले नव्हते. पुण्याचे जिल्हाधिकारी यांनीही स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत केवळ प्रशासकीय पूजा केली होती. मात्र, अशा कडक निर्बंधांच्या काळात खासदार दुबे यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे उघड झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यासाठी त्यांना हेलिकॉप्टर लँडिंगची परवानगी, वाहनांचा ताफा आणि विशेष व्हीआयपी सुविधा देण्यात आल्याचा आरोप होत आहे.
Bhimashankar Temple: भाजप खासदाराच्या भीमाशंकर दर्शनाने वादंग; ‘पुरातत्त्व’च्या कामामुळे मंदिर बंद असतानाही दिलं VIP दर्शन
हा मुद्दा विधान परिषदेत शिवसेना (ठाकरे गट) आमदार सचिन अहिर यांनी ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे उपस्थित केला. ‘महाराष्ट्राविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एका खासदाराला मंदिर बंद असतानाही इतकी विशेष वागणूक का दिली? हेलिकॉप्टर उतरण्याची परवानगी कोणी दिली आणि प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या सेवेत का उभी राहिली?,’ असा सवाल त्यांनी केला.
दर्शनाची परवानगी कोणी दिली?
यावर उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, ‘मंदिर बंद असताना त्यांना दर्शनाची परवानगी कोणी दिली; तसेच हेलिकॉप्टर लँडिंग आणि इतर सुविधांचा तपशील तपासला जाईल. संबंधितांकडून अहवाल मागवून सत्य समोर आणले जाईल.’ या प्रकरणामुळे पुणे जिल्हा प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Baramati Bypoll Election : बारामती पोटनिवडणुकीच्या A टू Z घडामोडी, बिनविरोध की रणधुमाळी? कोण काय म्हणालं?
‘स्थानिकांना विश्वासात घ्या’
हडपसर परिसरात प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या कामांमुळे पुणे-सोलापूर रस्त्यावर वाहतुकीचे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार चेतन तुपे यांनी विधानभवनात मागणी केली आहे की, मेट्रोचे काम सुरू करण्यापूर्वी योग्य वाहतूक नियोजन करावे आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाची अंमलबजावणी करावी. हडपसर ते खराडी, हडपसर ते सासवड रस्ता, हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते स्वारगेट या मेट्रो मार्गांचे काम लवकरच सुरू होणार आहे.
