काँग्रेसच्या हातातील ‘संविधान’ केवळ कव्हरपुरतेच लाल असून, आत ‘माओवादा’चे लाल पुस्तक आहे. संविधानाच्या नावाखाली देशात अराजकता निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव असून हे लोक ‘फेक नरेटिव्ह’च्या माध्यमातून संविधानविरोधी ताकद उभी करत आहेत. या ‘फेक नरेटिव्ह’चा मुकाबला करायचा असेल, तर अस्त्रही आणि शस्त्रही तीच लागतील; तसेच कार्यपद्धती त्यांच्यापेक्षा वरचढ लागेल,’ असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
Devendra Fadnavis : सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, फडणवीसांची टीका, डीजे वादावरही भाष्यलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूँज’ या पुण्यातील कार्यक्रमानंतर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची शहरात बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी काँग्रेस, राहुल गांधी आणि यूपीएतील घटकपक्षांवर जोरदार टीका केली. विरोधकांनी विचारसरणीची लढाई सोडून विविध मुद्द्यांवर ‘फेक नरेटिव्ह’ तयार करण्याचे तंत्र स्वीकारले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात सुमारे १८० स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून भाजपविरोधात खोटा प्रचार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला तीन चतुर्थांश जागांवर विजयी करून या प्रचाराला चोख उत्तर दिले, असेही ते म्हणाले.
निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, रिझर्व्ह बँक आणि नियंत्रक व महालेखापरीक्षक यांसारख्या संवैधानिक संस्थांवर सातत्याने प्रश्न उपस्थित करून जनतेचा त्यांच्यावरील विश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. ‘संविधानाचे नाव घ्यायचे आणि संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांनाच पायदळी तुडवत अराजकतेचे काव्य मांडायचे, असा प्रकार सुरू आहे. आता राहुल गांधींना छात्रों की गूँज आठवायला लागली. मात्र, ही ‘छात्रों की गूँज’ नसून ‘झूठ की गूँज’ आहे,’ अशी टीका त्यांनी केली. संसदेत २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. मात्र, जनगणनेशी संबंधित तांत्रिक अडचणींमुळे २०२९च्या निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्यासाठी केंद्र सरकारने दुरुस्ती विधेयक आणले होते.विरोधकांकडून त्याला विरोध करून महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
Amit Thackeray: शिवाजी महाराजांच्या शेजारी मोदींचा फोटो पाहताच अमित ठाकरे भडकले; फोटो हटवल्याने भाजप आक्रमक‘हर हर महादेव’च्या नाऱ्याने पुन्हा चढाई
‘छत्रपती शिवरायांनी आपल्याला लढायला शिकवले. मैदानात उतरताना शिवरायांची सेना ‘हर हर महादेव’चा नारा देऊन चढाई करायची. आता तशाच प्रकारची चढाई करण्याची वेळ पुन्हा आली आहे. आक्रमण करणारे किंवा विषय नवीन नाहीत; मात्र, विरोधकांनी कार्यपद्धती बदलली आहे. शत्रूने रणनीती बदलल्यावर शिवरायांनी गणिमी काव्यापासून गुप्तहेर यंत्रणेपर्यंत अनेक नवनवीन तंत्रांचा वापर करून शत्रूचा नायनाट केला. विरोधकांची ही नवी कार्यपद्धती समजून घेऊन आपल्यालाही तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर द्यावे लागेल,’ असे फडणवीस म्हणाले.
‘राम मंदिरानंतर कुंभमेळा लक्ष्य’
राम मंदिराच्या कथित घोटाळ्याचा ‘फेक नरेटिव्ह’ तयार करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता विरोधकांचे पुढील लक्ष्य नाशिकचा आगामी कुंभमेळा असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांबाबतही चुकीची माहिती पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जाऊ शकतो. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी अशा कथित ‘फेक नरेटिव्ह’ला तथ्यांच्या आधारे उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
Pune News : कार घेतली, हायवेवर जंगी सेलिब्रेशन, रील व्हायरल होताच पुणे पोलिसांनी हवा काढलीविचारसरणीऐवजी ‘कथना’चे राजकारण
सरकारच्या विरोधकांकडे धोरणांवर ठोस मुद्दे नसल्याने विविध विषयांवर खोटे कथानक उभे केले जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. सोशल मीडिया आणि विविध संस्थांच्या माध्यमातून हा प्रचार केला जात असल्याचे ते म्हणाले. भाजप कार्यकत्यांनी केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप न करता सरकारची कामे, निर्णय आणि योजनांची माहिती साम सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
विरोधकांनी विचारसरणीची लढाई सोडून विविध 66 मुद्द्यांवर ‘असत्य कथन’ तयार करण्याचे तंत्र स्वीकारले आहे. त्यांचा मुकाबला करायचा असेल तर अस्त्र आणि शस्त्रही तीच लागतील. कार्यपद्धतीही त्यांच्यापेक्षा वरचढ लागेल.-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
