• Fri. Mar 6th, 2026

    Anti-Conversion Bill : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धर्मांतर विरोधी कायदा मंजूर, मंत्री नितेश राणे यांची माहिती

    Anti-Conversion Bill : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धर्मांतर विरोधी कायदा मंजूर, मंत्री नितेश राणे यांची माहिती

    मंत्री नितेश राणे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धर्मांतर विरोधी कायदा मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. लव्ह जिहादच्या विरोधात हा कायदा करण्यात आल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धर्मांतर विरोधी कायदा मंजूर करण्यात आला आहे. मंत्री नितेश राणे यांनी आज विधान भवनाच्या आवारात माध्यमांना प्रतिक्रिया देताना याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत धर्मांतर विरोधी कायदा मंजूर करण्यात आला. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात धर्मांतर विरोधी कायदा लागू होणार असल्याची चर्चा होती. मंत्री नितेश राणे यांच्याकडून वारंवार याबाबत भाष्य केलं जात होतं. अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशनात याबाबतचा कायदा आगामी काळात पारित केला जाण्याची शक्यता आहे.

    मंत्री नितेश राणे काय म्हणाले?

    “विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी ठणकावून सांगितलं होतं की, महाराष्ट्रात सक्षम असा धर्मांतर विरोधी कायदा म्हणजे लव्ह जिहाद विरोधी कायदा हा आमचा हिंदुत्ववादी विचाराचे सरकार घेऊन येईल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा दिला होता. महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने विश्वास ठेवून आपल्या हक्काचं हिंदूत्ववादी विचारांचं सरकार महाराष्ट्रामध्ये निवडलं. आज मला मनापासून समाधान वाटतंय की, आज महाराष्ट्रात एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा हा कॅबिनेटमध्ये पास झाला आहे”, असं मंत्री नितेश राणे म्हणाले.”धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 या अंतर्गत येत्या लवकरच जीआर निघेल. यापुढे आमच्या कुठलीही हिंदू बहिणीकडे कुठलाही हिरवा साप, जिहादी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. अशा पद्धतीने त्याने कुठलाही लव्ह जिहाद करण्याचा प्रयत्न केला तर आता महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्षम धर्म स्वतंत्र अधिनय 2026 असा कायदा लागू झाला आहे. यासाठी मी आमचे हिंदूत्ववादी विचारसराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पूर्ण कॅबिनेटचे मनापासून आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली.

    दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईच्या धारावीत आगीमुळे बाधित झालेल्या 436 झोपडपट्टी धारकांसाठी देखील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व झोपडपट्टी धारकांसाठी देवनार येथे जागा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे या झोपडपट्टी धारकांना दिलासा मिळणार आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा