• Fri. Mar 6th, 2026
    Nagpur Blast : नागपूर स्फोट दुर्घटना; जखमी महिला श्रमिकाची मृत्यूशी झुंज अपयशी, दोन लेकरांचे मातृछत्र हरपले

    Nagpur Explosives Manufacturing Company Blast : नागपूरमध्ये झालेल्या भीषण स्फोटात अनेकांचे संसार उद्धस्त झाले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.

    एसबीएल कंपनी स्फोट रंजना घागरे मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    निखिल भुते, नागपूर : एकीकडे संसाराचा गाडा ओढण्यासाठी केलेली धडपड आणि दुसरीकडे नियतीने घातलेला घाला, अशा कात्रीत सापडलेल्या घागरे कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर कोसळला. कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात गंभीर जखमी झालेल्या रंजना उत्तम घागरे (वय 35) यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज अखेर संपली. नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    मुलांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हिरावलं

    रंजना यांचे पती उत्तम घागरे हे स्वतः सोलर एक्सप्लोजिव्ह कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पतीला हातभार लागावा आणि मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, याच अपेक्षेने रंजना एसबीएल कंपनीत कामाला जात होत्या. मात्र, काल रविवारी झालेल्या एका भीषण स्फोटाने रंजना यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचे सुखी स्वप्न क्षणात धुळीला मिळवले. रंजना यांच्या निधनाने 17 आणि 19 वर्षांच्या दोन मुलांच्या डोक्यावरील मायेचे छत्र कायमचे हिरावले गेले आहे. ज्या वयात मुलांना आईच्या मार्गदर्शनाची आणि आधाराची सर्वाधिक गरज असते, त्याच वयात या मुलांवर आईला गमावण्याची वेळ आली आहे.
    Maharashtra TimesNashik Crime : वडिलांनी पोटच्या लेकासह आयुष्य संपवलं, डोक्याला जबर मार; नाशिकमध्ये बापासह चिमुकल्याचा करुण अंतघराचा मुख्य आधारस्तंभ निखळल्याने घागरे कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडले असून, राऊळगाव परिसरात या घटनेमुळे तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. मूळ खापा येथील रहिवासी असलेले घागरे कुटुंबीय सध्या रोजगाराच्या निमित्ताने कोंढाळी येथे वास्तव्यास होते. प्राप्त माहितीनुसार, आज सायंकाळपर्यंत शवविच्छेदन करून कोंढाळी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
    Maharashtra TimesNagpur Blast: कसा नियतीचा फेर हा आला! कुणी आई गमावली, तर कुणी पत्नी; नागपूरच्या भीषण स्फोटात अनेक संसार उघड्यावर

    18 श्रमिकांचा जागीच मृत्यू

    कळमेश्वर तालुक्यातील राहुळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपनीत काल रविवारी झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या दुर्घटनेत 18 श्रमिकांचा जागीच मृत्यू झाला असून, मृतांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे. हाताला काम मिळेल या आशेने आणि प्रपंचाचा गाडा ओढण्यासाठी जीव मुठीत धरून काम करणाऱ्या या कष्टकऱ्यांचा काल रविवारी दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे धवलापूर, खेडी आणि परिसरातील अनेक गावांवर शोककळा पसरली असून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा