• Sat. Mar 7th, 2026
    Jalgaon News : इस्त्रायल-इराण युद्ध तापलं! जळगावचे 31 जण दुबईत अडकले; पालकांच्या जीवाची घालमेल

    Jalgaon News : इराणवर इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यादरम्यान, दुबईतील प्रसिद्ध आणि जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाजवळ ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यानंतर दुबईतील सर्व विमानतळ बंद करण्यात आले आहेत. येथून ये-जा करणाऱ्या सर्व विमानांची उड्डाणे अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहेत.

    इस्त्रायल इराण युद्ध खान्देशचे ८० जण दुबईत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : अमेरिका-इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातील म्हणजेच खान्देशच्या प्रवाशांवरही झाला आहे. खान्देशातून तब्बल 80 लोक दुबईला कार्यक्रमासाठी गेले असता तेथील अमेरिका-इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे काही प्रवासी अडकलेले आहेत. त्यामुळे अमेरिका-इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे अडकलेल्या प्रवाशांचा परतीचा प्रवास वाढण्याची शक्यता वाढली आहे.

    खान्देशातील 31 जण दुबईत अडकले

    एका विमा कंपनीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या आठवड्यात खान्देशातून 80 जण दुबईला गेले होते. यामध्ये 31 लोकं जळगाव शहरातील आहेत. अचानक सुरू झालेल्या या युद्धामुळे त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कोणाचे वडील, भाऊ तर कोणाचा पती दुबईत आहे. भारतातून दुबई संपर्कासाठी व्हाट्सअप चालत नाही. त्यामुळे वेगळे ॲप डाऊनलोड करावे लागत आहेत, त्यावर संदेशाची देवाण-घेवाण सुरू आहे.
    Maharashtra TimesKailash Kher : माणसं की जनावरं? नांदेडमधल्या रस्त्यांचे कैलाश खेरनी वाभाडे काढले, अशोक चव्हाणांसमोरच अ‍ॅक्टिंग करुन दाखवली
    गेल्या आठवड्यात शुक्रवारी दुबईमध्ये एका कार्यक्रमासाठी पोहोचलेल्या जळगाव शहरातील 31 जणांचा मुक्काम अमेरिका-इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे लांबण्याची शक्यता वाढली आहे. त्यांचा दुबईतून परतीचा प्रवास आज सोमवारी दोन मार्च रात्रीचा आहे. परंतु सध्या तरी तेथील हवाई व अचूक क्षेत्र प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्यामुळे नातेवाईकांच्या चिंतेत भर पडली आहे.

    दुबई नोकरीनिमित्त अनेक जण स्थायिक

    दुबईत नोकरीनिमित्त व लग्नानंतर स्थायिक झालेल्या मुला-मुलींचे पालक जळगावमध्ये चिंतेत आहेत. युद्धाची व्याप्ती वाढल्याने त्यांची मुलांच्या काळजीने जीवाची घालमेल वाढली आहे. दुबईतून लागलीच निघून येण्यासाठी कोणताच मार्ग सध्या उपलब्ध नाही, असंही पालकांनी सांगितलं आहे.
    Maharashtra TimesNagpur Blast : नागपूर स्फोट दुर्घटना; जखमी महिला श्रमिकाची मृत्यूशी झुंज अपयशी, दोन लेकरांचे मातृछत्र हरपले
    जळगावमधून गेलेले दुर्गेश चौधरी यांनी सांगितलं की ‘खान्देशातील शिरपूर, रावेर, पाचोरा आणि चाळीसगाव तर इतर ठिकाणची मिळून 80 जण दुबईत आलो असून यामध्ये जळगाव शहरातील 31 जण आहेत. काहीजण कुटुंबासह आले आहेत. आज दोन मार्चला रात्री 9:15 वाजता परतीचा प्रवास आहे. परंतु युद्धामुळे हवाई व अचूक क्षेत्र बंद आहे. सर्वांचा मुक्काम दुबई फेस्टिवल सिटीमधील एका हॉटेलमध्ये आहे. हल्ला झालेल्या ठिकाणापासून हा भाग 50 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. युद्धामुळे रस्त्यावर स्मशान शांतता आहे’, असं चौधरी यांनी तिथल्या परिस्थितीबाबत भाष्य केलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा