• Fri. Mar 6th, 2026

    Holi 2026: मुंबईकरांनो, होळी खेळा, पण शिस्तीत! पोलिसांची मार्गदर्शक सूचना, नियम मोडल्यास थेट कारवाई

    Holi 2026: मुंबईकरांनो, होळी खेळा, पण शिस्तीत! पोलिसांची मार्गदर्शक सूचना, नियम मोडल्यास थेट कारवाई

    मुंबई : होळी आणि धुळीवडीच्या सेलिब्रेशनला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलिस सतर्क झाले आहेत. सण साजरा करताना कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. होळीसाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीपासून ते धुळवडीला फुगे, रंग फेकणाऱ्यांना पोलिसांनी ताकीद दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कुणी प्रयत्न केल्यास त्याच्यावर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला असून, संपूर्ण मुंबईत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

    मुंबईमध्ये होळी आणि धुळवड मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. यादरम्यान सार्वजनिक ठिकाणी रंगीत पाणी फेकणे, अश्लील बोलणे आणि त्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नागरिकांवर प्रतिबंधक कारवाई करणे, सार्वजनिक उत्सवांमध्ये बाधा आणणाऱ्यांवर हद्दपार करणे, सार्वजनिक उद्याने, समुद्र किनारे, चौपाट्या, गर्दीची ठिकाणे यांसह महत्त्वाची ठिकाणी पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे.

    Mumbai Crime: आठवीतील विद्यार्थ्याची तलावात बॉडी; पोहताना बुडाल्याचा संशय, पण सत्य काही वेगळंच, तीन मित्र अटकेत
    सार्वजनिक मोठ्या स्वरूपाच्या होळ्या पेटवण्याच्या ठिकाणी गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणे, गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून मारामारी, महिला, मुलींच्या छेडछाडीचे प्रकार अथवा इतर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. विशेष करून, मिश्र वस्त्यांवर नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त ठिकाणी नाकाबंदी लावून मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची धरपकड करण्याचे आदेश सर्व पोलिसांना देण्यात आले आहेत.

    नागरिकांनी देखील होळी आणि धुळवड साजरी करताना सामाजिक भान राखावे तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची सावधगिरी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    Maharashtra TimesPOSH Audit : राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये 30 दिवसांत ‘पॉश ऑडिट’, अन्यथा कारवाई; महिला आयोगाचे निर्देश
    पोलिसांच्या नागरिकांना सूचना
    -होळीच्या लाकडासाठी बेकायदा वृक्षतोड करू नये
    -अश्लील हावभाव, वर्गणी गोळा करण्यावरून होणारे वाद टाळावेत
    -प्रतिष्ठित व्यक्तींची नक्कल अथवा बॅनरबाजी करू नये
    -पादचाऱ्यांवर पाणी, रंगीत पाणी किंवा रंग टाकू नयेत
    -रंगीत किंवा साध्या पाण्याने भरलेले फुगे फेकू नयेत
    -मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी गडबड, गोंधळ घालू नये
    -जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य किंवा समाजमाध्यमावर पोस्ट करू नये
    -लाऊडस्पीकरच्या आवाजाच्या मर्यादेचे भान राखावे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed