• Fri. Mar 6th, 2026

    Ghansoli to Airoli Flyover: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीसाठी खाडीवर पूल, घणसोली ते ऐरोली उन्नत मार्गाला गती; कसा असेल मार्ग?

    Ghansoli to Airoli Flyover: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीसाठी खाडीवर पूल, घणसोली ते ऐरोली उन्नत मार्गाला गती; कसा असेल मार्ग?

    Navi Mumbai Palm Beach Road: नवी मुंबईतील पाम बीच रोडचा विस्तार सुरू आहे. या 3.47 किमी लांब मार्गावर 1.9 किमी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नवी मुंबई: ऐरोली ते घणसोली उन्नत मार्गाचं काम सुरू केलं आहे. या मार्गाने ठाण्याच्या खाडीवरील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होणार आहे. नवी मुंबई महापालिकेकडून या मार्गाचं काम करण्यात येणार असून, गेली अनेक वर्ष हे रखडलं होतं. पण आता या कामाला सुरूवात झाली असून खांब उभारणी सुरू करण्यात आली आहे.

    कसा असेल मार्ग?

    नवी मुंबईत पाम बीच मार्गाचा विस्तार प्रस्तावित होता. सिडको बेलापूर ते ऐरोली असा 29.15 किमीचा मार्ग तयार करणार होते. घणसोली पुढील भागात कांदळवन असल्यामुळे बेलापूर ते घणसोली 19.20 किमी मार्गच तयार झाला होता. यापुढे बेलापूर ते ऐरोली सेक्टर 10अ या मार्गाचं काम रखडलं होतं. उर्वरित 2 किमी भागात कांदळवन असल्यामुळे याला या मार्गाला मंजुरी मिळत नव्हती. शेवटी हा मार्ग बदलून ऐरोली ते मुलुंड खाडीपूल उभारण्यात येणार आहे. हा मार्ग 3.47 किमी लांब असून यापैकी 1.9 किमी भाग घणसोली ते ऐरोली उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे.Maharashtra TimesDahisar-Mira-Bhayander Metro: मेट्रो लाइन 9ची चाचणी फेरी यशस्वी, किरकोळ बदलांनंतर पहिला टप्पा होणार सुरू; दहिसर ते काशीगाव थेट जोडणी

    या उन्नत मार्ग सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका मिळून बांधणार असून या मार्गासाठी एकूण 550 कोटी रूपयांचा खर्च येणं अपेक्षित आहे. आता पर्यावरण विभागाकडून परवानगीही मिळाली असून हे काम सुरू करण्यात आलं आहे. आता माती परिक्षणाचे काम पूर्ण झालं असून खांब उभारणी सुरू झाली आहे. या पुलाचं काम सप्टेंबर 2026ची डेडलाइन दिली होती. पण आता ते 2027पर्यंत होण्याची शक्यता आहे. ठाणे-बेलापूर या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

    Maharashtra TimesNavi Mumbai News: ठाणे-नवी मुंबई विमानतळ उन्नत ‘डबल डेकर’ मार्ग, 90 मिनिटांचा प्रवास अर्ध्या तासांत; कसा असेल 25 किमी लांब मार्ग?

    कुठून-कुठे जोडणार?

    हा मार्ग सुरू होताच ठाणे-बेलापूर मार्गासह ऐरोलीमधील वाहतूक कोंडी फुटणार आहे. त्यासोबत हा मार्ग ऐरोली ते मुलुंड पूलाला जोडण्याचाही प्रस्ताव आहे. त्यासह ऐरोली – कटाई नाका मार्गालाही जोडणी मिळणार आहे. यानंतर कल्याण, बदलापूर, अंबरनाथ आणि मुरबाड परिसरात जाणाऱ्या नागरिकांनाही फायदा होणार आहे. शिवाय नवीन सुरू झालेल्या नवी मुंबई विमानतळालाही जोडणी मिळणार आहे.

    ठाणे बेलापूर मार्गावरून एमआयडीसी, माइंडस्पेस, सायन-पनवेल दृतगती मार्ग आणि वरिस्टा जंक्शनला जोडणी मिळते. या भागांत जाणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा