• Tue. Mar 10th, 2026

    पाकिस्तान सुपर 8 मधील दुसरा सामनाही पावसामुळे रद्द झाल्यास …..

    ByMH LIVE NEWS

    Feb 28, 2026
    पाकिस्तान सुपर 8 मधील दुसरा सामनाही पावसामुळे रद्द झाल्यास …..

    इंग्लंडने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आपल्या सुपर 8 मोहिमेची सांगता विजयाने केली.इंग्लंडने शुक्रवारी 27 फेब्रुवारीला रंगतदार झालेल्या सामन्यात न्यूझीलंडवर मात करत सुपर 8 फेरीतील सलग आणि एकूण तिसरा विजय मिळवला. तर न्यूझीलंडने या पराभवासह सुरक्षितपणे सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी गमावली. इंग्लंडच्या विजयामुळे पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला. इंग्लंडच्या विजयामुळे आता पाकिस्तान या स्पर्धेत कायम राहिली आहे. त्यामुळे पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल तर तर त्यांना त्यांच्या सुपर 8 फेरीतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवावा लागणार आहे.

    पाकिस्तानचा पहिला सामना पावसामुळे वाया

    पाकिस्तानचा सुपर 8 फेरीतील न्यूझीलंड विरुद्धचा सामना हा पावसामुळे वाया गेला. त्यामुळे पाकिस्तान आणि न्यूझीलंडला प्रत्येकी 1-1 गुण मिळाला. न्यूझीलंडने त्यानंतर श्रीलंकेवर मात केली. त्यामुळे न्यूझीलंडच्या खात्यात 3 गुण झाले. न्यूझीलंडला शुक्रवारी इंग्लंडवर मात करुन उपांत्य फेरी गाठण्याची संधी होती. मात्र न्यूझीलंडलने संधी दवडली. त्यामुळे आता पाकिस्तान श्रीलंकेवर मोठ्या फरकाने मात करुन सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी आशादायी आहे. मात्र पाकिस्तानचा श्रीलंकेविरुद्धचा सामनाही पावसामुळे वाया गेला तर काय? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

    पाकिस्तान मोठ्या फरकाने जिंकणार?

    पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल तर श्रीलंकेविरुद्ध मोठ्या फरकाने जिंकावं लागेल. न्यूझीलंडच्या खात्यात 3 गुण आहेत. तर पाकिस्तानने हा सामना जिंकल्यास 3 गुण होतील. त्यामुळे दोन्ही संघांचे गुण बरोबर होतील. मात्र त्यानंतरही न्यूझीलंड नेट रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. त्यामुळे पाकिस्तानला या सामन्यात फक्त जिंकून काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध नेट रनरेटचं समीकरण डोक्यात ठेवून मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

    त्यामुळे हा सामना पावसामुळे किंवा इतर कारणामुळे रद्द झाला तर पाकिस्तानचे 2 गुण होतील त्याशिवाय दुसरं तिसरं काहीच होणार नाही. तसेच यासह पाकिस्तानचं पॅकअप होईल आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

    पाकिस्तानला किती फरकाने जिंकावं लागणार?

    दरम्यान पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध किती फरकाने जिंकावं लागणार? हे समजून घेऊयात. पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध 65 धावांनी किंवा 13 ओव्हरमध्ये हा सामना जिंकावा लागेल. त्यामुळे पाकिस्तान काय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed