Mahim Fort: सीमाशुल्क विभागाच्या अखत्यारित असलेल्या या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहेच, शिवाय कस्टम स्टेशन म्हणूनही त्याची वेगळी ओळख आहे.
बाराव्या-तेराव्या शतकात राजा बिंबदेव यांच्या वंशजांनी उभारलेला हा किल्ला मुंबईच्या सात बेटांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. काळाच्या ओघात किल्ल्याभोवती अतिक्रमणे वाढली आणि या ऐतिहासिक वास्तूचे अस्तित्व धूसर होत गेले. मात्र गेल्या काही वर्षांत महापालिकेने विशेष मोहीम राबवत येथील २७५ झोपडीधारकांचे पुनर्वसन केले.
Devendra Fadnavis: राजकारण केल्यास तसेच उत्तर मिळेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
संवर्धनामुळे या वास्तूचा लौकिक अधिक वाढेल, असा विश्वास सीमाशुल्क विभागाचे प्रधान आयुक्त अजयकुमार पांडे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त नितीन तगाडे, विक्रम फडके, महापालिका उपायुक्त प्रशांत गायकवाड, उपायुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, सहाय्यक आयुक्त (जी उत्तर विभाग) योगेश देसाई, पुरातन वारसा संवर्धन सल्लागार विकास दिलावरी, वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेतील संरचनात्मक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. के. के. सांगळे आदी उपस्थित होते.
Pawanraje Nimbalkar Case : पवनराजे निंबाळकर प्रकरणात पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, माफीचा साक्षीदार फितुर घोषित
पर्यटन नकाशावर स्थान मिळवून देणार
मुंबईच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय असलेल्या माहीम किल्ल्याचे संवर्धन करणे ही महानगरपालिकेसाठी अभिमानाची बाब असल्याचे महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नमूद केले. माहीम किल्ला अतिक्रमणमुक्त करणे व संवर्धन ही दीर्घकालीन प्रक्रिया होती. अनेक अडचणींवर मात करत हे काम पूर्ण झाले असून आता या वास्तूला पर्यटनाच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
