• Sat. Mar 7th, 2026

    Dombivli-Thane Bus: लोकलची गर्दी कमी करण्यासाठी डोंबिवली-ठाणे बस, 4 मार्चपासून सेवा सुरू; पण डोंबिवलीकरांना खरंच होईल का फायदा?

    Dombivli-Thane Bus: लोकलची गर्दी कमी करण्यासाठी डोंबिवली-ठाणे बस, 4 मार्चपासून सेवा सुरू; पण डोंबिवलीकरांना खरंच होईल का फायदा?

    Thane to Kalyan-Dombivli Buses: ठाण्यापासून डोंबिवलीपर्यंत लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. 4 मार्चपासून ही सेवा सुरू होणार आहे. पण डोंबिवलीकरांना या सेवेचा खरंच फायदा होईल का हा मोठा प्रश्न आहे.

    डोंबिवली: डोंबिवली लोकलमधून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्याला प्रवाशांची संख्या मोठी आहे. सकाळी शाळा, ऑफीस आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होते. आता डोंबिवलीकरांना ठाण्याला जाण्यासाठी एक उत्तम पर्याय मिळणार आहे. केडीएमसी आणि टीएमसीकडून या मार्गावर पहिल्यांदाच बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

    बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

    दोन आठवड्यांपूर्वी, बारावीच्या परिक्षेसाठी जाताना डोंबिवलीच्या 18 वर्षीय विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. सकाळच्या गर्दीदरम्यान मुंब्रा-कळवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे ही बससेवा सुरू करणे गरजेचे होते. येत्या 4 मार्चपासून ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरूवातील दोन 40 सीटर बस दाखल होणार आहेत. पीक अव्हरदरम्यान, प्रत्येकी 4 म्हणजेच एकूण 8 बस फेऱ्या सुरू होणार आहेत.Maharashtra TimesNavi Mumbai News: ठाणे-नवी मुंबई विमानतळ उन्नत ‘डबल डेकर’ मार्ग, 90 मिनिटांचा प्रवास अर्ध्या तासांत; कसा असेल 25 किमी लांब मार्ग?

    कसा असेल मार्ग?

    ही बस सेवा डोंबिवलीच्या मोठागाव सर्कलवरून सुरू होणार असून घोडबंदर रोडदरम्यान धावणार आहे. मोठागाववरून मोठागाव मानकोली पूल ते मानकोली आणि माजिवाडा चौकापर्यंत या बसचा मार्ग असणार आहे. त्यामुळे डोंबिवलीवरून ठाण्याला प्रवास करणाऱ्यांचा फायदा होणार आहे अशी आशा व्यक्त केली जात आहे.

    डोंबिवलीकरांना फायदा नाहीच?

    परंतु, प्रत्यक्ष प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे का असा प्रश्न देखील आहे. लोकलवरील ताण कमी करण्यासाठी या बससेवा सुरू केल्या असल्या तरी मोठागाव परिसर डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्थानकापासून 15-20 मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे डोंबिवली पूर्व, मानपाडा, तसेच रेल्वे स्थानकाजवळील राहणाऱ्या प्रवाशांना बस ऐवजी लोकलचा पर्याय निवडावा लागणार आहे.

    Maharashtra TimesKhandesh Expressway: उत्तर महाराष्ट्र- मराठवाडा ‘खान्देश एक्स्प्रेस’ महामार्ग! सहापदरी, 105 किमी लांब मार्गाने थेट समृद्धीला जोडणार

    डोंबिवली पश्चिमेत राहणारा एक रहिवासी, श्रेयस धोपेश्वरकर याच्या मते, प्रस्तावित बस स्थानक घरापासून तब्बल 20 मिनिटे लांब असून, लोकलचा पर्यायच निवडावा लागणार आहे. “ही बससेवा स्वामिनारयण सिटी जवळच्या नागरिकांसाठी जास्त उपयोगी आहे. त्याचबरोबर, त्या परिसरातून रेल्वे ट्रॅक जात असल्यामुळे कुंपण लावून तो मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बस थांब्यापर्यंत पोहचणं कठीण आहे.” श्रेयस महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी असून त्याला दररोज सकळी लोकलच्या गर्दीमध्ये प्रवास करावा लागतो.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा