Pune Solapur Highway Accident : टायर पंक्चर झालेला आयशर टेम्पो धोकादायक स्थितीत महामार्गाच्या बाजूला उभा असताना इको कारच्या चालकाने आयशर टेम्पोला पाठीमागून धडक दिली.
मायलेकासह तिघांचा मृत्यू
या अपघातात अदिती अमर हातेकर (वय २५) आणि त्यांच्या मुलगा जय अमर हातेकर (वय दोन) आणि सखूबाई ईश्वर गेजगे (वय ६०, सर्व रा. सांगोला, जि. सोलापूर) हे अपघातात जागीच ठार झाले. इको गाडीवरील चालक कबीरदास ईश्वर गेजगे (५०, रा. पाटस, ता. दौंड) हे गंभीर जखमी झाले. त्यांची पत्नी स्वाती गेजगे (३४) आणि मुलगी समृद्धी गेजगे (१० महिने) किरकोळ जखमी झाल्या. रात्री उशिरापर्यंत भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. महामार्गावरील नादुरुस्त मालवाहतूक वाहने तत्काळ हटवण्याची मागणी या निमित्ताने होत आहे.
कसा झाला अपघात?
अपघाताबाबत सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी माहिती दिली. टायर पंक्चर झालेला आयशर टेम्पो धोकादायक स्थितीत महामार्गाच्या बाजूला उभा होता. त्या वेळी इको कारच्या चालकाने आयशर टेम्पोला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात इको गाडीचे प्रचंड नुकसान झाले. भिगवण पोलिसांनी जखमींना गाडीतून बाहेर काढण्यास मदत केली. अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला होता.
Pune Crime : पुण्यात मसाज पार्लरवर पोलिसांची धाड, इमारतीतून उडी मारल्याने महिलेचा मृत्यू, पतीच्या मागणीनंतर CID चौकशी
केमिकल टँकरचा भीषण अपघात
दुसरीकडे, मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघाताची घटना ताजी असतानाच सुरत-नागपूर महामार्गावर केमिकलने भरलेल्या एका टँकरचा भीषण अपघात होऊन आग लागल्याची घटना घडली. टँकरने रस्त्याच्या दुभाजकाला धडक दिल्याने हा पेट घेतला आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला. या घटनेमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणाजवळ गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
Nagpur Crime : 32 वर्षीय सख्ख्या मामीसोबत किळसवाणं कृत्य, 30 वर्षीय भाच्याला अटक, बेडवर झोपल्याचं भासवून घाणेरडं काम
केमिकलने भरलेला हा टँकर साक्रीहून धुळ्याच्या दिशेने जात होता. चालकाचा ताबा सुटल्याने टँकर थेट दुभाजकाला जाऊन धडकला. धडक इतकी भीषण होती की टँकरने त्वरित पेट घेतला. काही क्षणांतच केमिकलमुळे टँकरचा मोठा स्फोट झाला, ज्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. टँकरने पेट घेताच चालक आणि क्लिनरने प्रसंगावधान राखत चालत्या टँकरमधून उड्या घेतल्या, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यावर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
महाराजांच्या शौर्याची कथा, अमोल कोल्हे भरभरून बोलले, भाषण ऐकून सारेच भारावले
