• Tue. Jun 30th, 2026
    विधानपरिषद कामकाज – महासंवाद

    मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन – सभापती प्रा.राम शिंदे

    मुंबई, दि. 26 : दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस राज्यात ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून उत्साहात साजरा केला जातो. त्याच औचित्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान “जावे विनोदाच्या गावा” हा कार्यक्रम  27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.00 ते 11.45 या वेळेत विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात होणार आहे, अशी माहिती विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी सभागृहाला दिली.

    या कार्यक्रमास पिठासीन अधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री, मराठी भाषा मंत्री, मराठी भाषा समितीचे प्रमुख,  मंत्री व राज्यमंत्री, दोन्ही सभागृहांचे सदस्य तसेच पत्रकारांनी रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

    याच प्रसंगी वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित ‘लोक सेवेचा लोकजागर’ या ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात येणार असल्याचेही सभापती प्रा. शिंदे यांनी सांगितले.

    000

    संजय ओरके/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed