केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या भरतीत एका विशिष्ठ कारणामुळे अपात्र ठरविण्यात आलेल्या एका उमेदवाराने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्वाळा दिला आहे.
प्रातिनिधिक फोटो(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : एका पुरुषाच्या छातीवर तिसरे स्तनाग्र असल्याने त्याला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या भरतीत अपात्र ठरविण्यात आले. मात्र, तिसरे स्तनाग्र असणे हे अपात्रततेचे कारण ठरू शकत नाही, असा निर्वाळा देत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या उमेदवाराला दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने पुनर्विचार वैद्यकीय परीक्षण मंडळाचा आदेश रद्द केला. गोंदिया जिल्ह्यातील ‘रमेश’ (काल्पनिक नाव) या उमेदवाराला कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदासाठी निवड प्रक्रियेदरम्यान १८ नोव्हेंबर २०२५ रोजी अपात्र ठरविण्यात आले होते. कारण म्हणून त्याच्या छातीवर छोटेसे तिसरे स्तनाग्र असल्याचे नमूद करण्यात आले. या निर्णयाविरोधात रमेशने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान रमेशचे वकील ॲड. अनीश कठाणे यांनी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्सच्या वैद्यकीय परीक्षण मार्गदर्शक तत्त्वांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यानंतर न्यायालयाने महत्त्वाचा निर्वाळा दिला.
कोर्टात नेमका युक्तिवाद काय झाला?
संबंधित मार्गदर्शक तत्त्वांतील कलम ६ मध्ये छातीशी संबंधित अपात्रतेची कारणे नमूद आहेत; मात्र त्यात तिसऱ्या स्तनाग्राचा कोणताही उल्लेख नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर (एम्स, नागपूर) यांनी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या वैद्यकीय अहवालात तिसऱ्या स्तनाग्रावर शस्त्रक्रियेची गरज नसून त्यामुळे उमेदवाराच्या कार्यक्षमतेवर किंवा पात्रतेवर परिणाम होत नाही, असे स्पष्ट नमूद असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर कागदपत्रांचा विचार करून खंडपीठाने पुनर्विचार वैद्यकीय परीक्षण मंडळाचा आदेश कायदेशीरदृष्ट्या टिकाव धरू शकत नसल्याचे नमूद केले व तो रद्दबातल ठरविला.
नव्याने होणार वैद्यकीय परीक्षण
उमेदवाराचे नव्याने वैद्यकीय परीक्षण करून त्याच्या पात्रतेबाबत २० मार्चपर्यंत कायद्यानुसार निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाला दिले. तसेच, पुनर्विचार वैद्यकीय मंडळाला एम्सच्या मताशी असहमती असल्यास त्यामागील ठोस व स्पष्ट कारणे अहवालात नमूद करण्याचेही निर्देश देण्यात आले.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा