दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेनंतर DGCA ने पहिली मोठी कारवाई केली आहे. DGCA ने VSR कंपनीच्या चार विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात नंतर DGCA ने पहिली मोठी कारवाई केली आहे. अजित पवार VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करत असताना विमानाचा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी VSR कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी प्रचंड वातावरण तापलेलं असताना DGCA कडूनही तपास केला जात होता. विविध संस्थांकडून या प्रकरणी तपास केला जात आहे. या दरम्यान, DGCA ने VSR च्या 4 विमानांच्या उड्डाणावर बंदी घातल्याची मोठी माहिती समोर येत आहे. लेअरजेट 40/45 मॉडेलच्या चार विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. DGCA ने VT-VRA, VT-VRS, VT-VRV, VT-TRI या विमानाच्या उड्डाणावर बंदी घातली आहे.
DGCA कडून VSR कंपनीला कारणे दाखवा नोटीस
डीजीसीएकडून VSR कंपनीच्या विमानांचे ऑडिट केले. या ऑडिटमध्ये वीएसआर कंपनीच्या चार विमानांमध्ये देखभालीत चुका आणि कमतरता असल्याचं डीजीसीएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कंपनीकडून हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही म्हणून या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर VSR कंपनीवर गंभीर आरोप केले जात होते. तपास यंत्रणांनी अपघातग्रस्त विमानाची तपासणी केली. तसेच विमानाचा डेटा गोळा करण्याचं काम देखील युद्ध पातळीवर सुरु करण्यात आलं होतं. याबाबतचे वेगवेगळे दावे, आरोप केले जात होते. यानंतर DGCA कडून VSR कंपनीच्या विमानांचं ऑडिट केलं जाणार असल्याची मोठी बातमी समोर आली होती. त्यानुसार आता DGCA ऑडिट करण्यात येत आहे. विशेष म्हणजे DGCA ने VSR कंपनीच्या चार विमानांच्या उड्डाणावर बंदी सुद्धा घालण्यात आली आहे. VSR कंपनीसाठी हा मोठा धक्का आहे. या प्रकरणी आता काय-काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा