• Sat. Jun 6th, 2026
    Chhatrapati Sambhajinagar News : गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या, 28 वर्षीय महिलेला पडलं महागात; अतिरक्तस्रावाने हृदयद्रावक अंत

    Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं?

    गर्भपाताच्या गोळ्या महिलेचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाट नांद्रे परिसरात एक हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. गर्भपातासाठी घेतलेल्या गोळ्यांचं सेवन एका 28 वर्षीय महिलेच्या जीवावर बेतले असून, तब्बल 13 दिवसांच्या मृत्यूशी झुंझीनंतर या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

    नेमकं काय घडलं?

    आयशा समीर मुल्ला (रा. घाट नांद्रे) असं मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशा यांनी 10 फेब्रुवारीच्या सुमारास गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन केले होते. त्यानंतर त्यांना अचानक त्रास जाणवू लागला आणि मोठ्या प्रमाणावर अतिरक्तस्राव सुरू झाला. प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने सिल्लोड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे सुमारे 10 दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले, मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने आणि प्रकृती अधिकच चिंताजनक बनल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, काल सोमवारी रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उपचार सुरू असतानाच आयशा यांचा मृत्यू झाला. गर्भपाताच्या गोळ्यांच्या सेवनानंतर झालेल्या अतिरक्तस्रावामुळेच त्यांचा जीव गेल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
    Maharashtra TimesAhilyanagar Accident : भल्यापहाटे काळाची झडप, कार अन् ट्रकचा भीषण अपघात; त्रिकोणी कुटुंबासह चौघांचा करुण अंत

    सिल्लोडमध्ये बेकायदेशीर औषध विक्रीचे जाळे?

    या घटनेमुळे सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या गोळ्या आयशा यांनी स्वतःहून मेडिकलवरून विकत घेतल्या होत्या की त्यांना कोणीतरी त्या बेकायदेशीरपणे उपलब्ध करून दिल्या होत्या, याचा तपास आता पोलीस करत आहेत. परिसरात यापूर्वीही अशा प्रकारचे अवैध प्रकार समोर आले असल्याने, पोलिसांनी सखोल तपास केल्यास औषध विक्री करणाऱ्या मोठ्या टोळीचे पितळ उघडे पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
    Maharashtra TimesRaj Thackeray Japan Girl : ‘या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद!’ राज ठाकरेंनी मानले तरुणीचे आभार, पण का?

    छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री काय घडलं?

    जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चांगतपुरी गावाजवळ काल रात्री एक भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट उजव्या कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत कारमधील पती-पत्नीसह त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला स्थानिक तरुण असे तिघेजण बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पोलिसांकडून शोधकार्य सुरू आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा