• Fri. Mar 6th, 2026

    Devendra Fadanvis: मैत्री, कर्तव्य, शब्दाचे पक्के अन् शेवटची पावणेतीन तासांची भेट; अजित पवारांबद्दल अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस भरभरून बोलले

    Devendra Fadanvis: मैत्री, कर्तव्य, शब्दाचे पक्के अन् शेवटची पावणेतीन तासांची भेट; अजित पवारांबद्दल अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस भरभरून बोलले

    Devendra fadanvis on ajit pawar: “दादा एका पिढीचा आत्मविश्वास होते,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. शोकप्रस्तावावर बोलताना फडणवीसांनी दादांसोबतच्या शेवटच्या भेटीचा किस्सा आणि २०१९ च्या शपथविधीचे गुपित उलगडले आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली अजित पवारांसोबतच्या शेवटच्या बैठकीची आठवण.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: विधिमंडळ अधिवेशन सुरु झालं आहे. आज त्याचा पहिला दिवस होता. यावेळी अजित पवारांच्या नावाचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला होता. आजचा सर्व दिवस हा शोकप्रस्तावावरच चर्चा होणार आहे. अजित पवारांच्या शोकप्रस्तावावर सर्वांना बोलण्याती संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रस्तावामध्ये कोण काय बोलतं याकडे सर्वांचं लक्ष लागेलेलं आहे. दरम्यान यापूर्वी कोणत्याही शोकप्रस्तावावर फक्त विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभासदच बोलत असत. दरम्यान, यावेळी सभागृहातल्या सदस्यांनी अजित पवारांबद्दलच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी अजित पवारांबद्दलच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस हे यावेळी अजित दादांसोबत झालेल्या शेवटच्या बैठकीवर बोलले आहेत. त्याचवेळी ही बैठक तब्बल पावणे तीन तास चालली होती, असंही यावेळी मुख्यमंत्र्‍यांनी सांगितलं आहे.

    शेवटची भेट कशी होती?

    अजित पवारांचा आणि माझा जन्म 22 जुलैचा. ते माझ्यापेक्षा 11 वर्ष मोठे. त्यांच्यात माझ्यात एक दशकाहून अधिक दीर्घ काळ जवळीक होती. 2014 नंतर आमच्यात भावनिक नाते तयार झाले होते. अजित पवारांसोबत माझे नाते मित्रत्त्वाचे नाते होते, ते केवळ स्ट्रॅटेजिक नेते नव्हते, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    कधी झाली होती शेवटची भेट

    27 जानेवारी 2026 रोजी आमची भेट झाली होती. ही भेट पायाभूत सुविधांची होती. त्या बैठकीमध्ये त्यांनी मुद्दे मांडले. नंतर आमची अँटीचेंबरमध्ये शेवटची भेट झाली. दादा कुठलेही काम कागदावर लिहून घ्यायचे. दादा हे एका पिढीचा आत्मविश्वास होते. शेती, पशुपालन, याविषयी पूर्ण जाण असलेले ते होते. संघर्षाला त्यांनी पाठ फिरवली नाही. जाहीर माफी मागायला त्यांनी मागे पाहिलं नाहीय अनेकांचा आधारवड असलेले दादा आपल्यात नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, असं प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्र्‍यांनी केलं आहे.

    Maharashtra TimesEknath Shinde : सार्वजनिक बांधकाम खात्याची धुरा भुसेंकडे, तर नगरविकासची जबाबदारी सामंतांना; एकनाथ शिंदेंच्या पत्रात काय?

    माझ्याशी चर्चा केली आणि…

    अजित पवार हे शब्द पाळणारे नेते होते. याचा अनुभव मला 2019 साली आला. दिलेला शब्द मोडणार नाही त्यांनी म्हटलं. पहाटेचा शपथविधी नव्हे तर सकाळचा शपथविधी असं ते म्हणायचे. काही किंमत मोजावी लागली. सुप्रीम कोर्टात निर्णय विरोधात गेल्यावर त्यांनी वर्षा बंगल्यावर माझ्याशी चर्चा केली आणि त्यांचा निर्णय बदलवला. त्यांच्या स्वभावामध्ये पारदर्शकता होती. ते तोंडावर बोलायचे. राजकीय परिणामांची पर्वा करायचे नाही. काम होणारे असेल तर ते तात्काळ करायचे आणि दादा म्हणतात ते करतात असं राजकारणातलं चित्र विरळ आहे, असं फडणवीस म्हणाले.

    शेवटची आठवण

    शेवटच्या भेटीतील आठवण सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाचं प्रझेंटेशन झालं. बैठक संपली, कोणतंही काम त्यांच्या कागदावर लिहलेलं असायचं काय बोलायचं आहे गे त्यांनी थोडक्यात लिहिलेल असायच. पावणेतीन तास आम्ही एकत्र होतो.

    Maharashtra TimesAmol Mitkari: अजित पवारांच्या अपघाताबाबत अमोल मिटकरींकडून आरोपांचा नवा बॉम्ब; पायलटवर थेट ‘सुसाईड मिशन’चा आरोप

    ती आमची शेवटची भेट असेल याची पुसटशीही कल्पना नव्हती, असं बोलताना मुख्यमंत्री फडणवीस भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा