• Fri. Mar 6th, 2026

    राज्यसभेच्या उमेदवारीवरून संभ्रम, शरद पवारांचा उल्लेख करत राऊतांनी गणित मांडलं

    राज्यसभेच्या उमेदवारीवरून संभ्रम, शरद पवारांचा उल्लेख करत राऊतांनी गणित मांडलं

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    राज्यसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये विसंगत भूमिका दिसतेय. आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यात विरोधाभास दिसून आला. राज्यसभेची सातवी जागा आमचीच असे म्हणत आदित्य ठाकरेंनी पक्षाची भूमिका सांगितली. तर संजय राऊतांनी मात्र शरद पवारांनी राज्यसभेवर जावं, अशी इच्छा व्यक्त केली. यावरून निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत संजय राऊत यांनी खुलासा केला. आमचा पक्ष मोठा असल्याने पहिला हक्क हा शिवसेनेचा राहील, असे राऊत म्हणाले. शरद पवारांनी अद्याप स्वतःची उमेदवारी जाहीर न केल्याने प्रश्न निर्माण होतो असेही ते म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed