• Tue. Jun 9th, 2026
    Abhishek Kalamkar : नोकरीचं आमिष देवून तरुणीसोबत नको ते कृत्य केल्याचा आरोप, माजी महापौरावर चित्रा वाघ संतापल्या

    अहिल्यानगरच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरात व्हायरल झालेल्या कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे. यामुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाने राज्यभरात मोठी चर्चा रंगली आहे. नोकरीचे आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार, लॉजवर बोलावणे तसेच व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील कृत्य केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

    या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून विविध स्तरातून कठोर कारवाईची मागणी होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे नागरिकांत संताप वाढला असून, सभ्य चेहऱ्यामागे विकृतीचा खरा चेहरा अशी चर्चा सुरू आहे. राजकारणात उच्च पदावर असलेली व्यक्ती अशा गंभीर आरोपांमध्ये अडकणे म्हणजे समाजातील महिलांच्या विश्वासाला तडा देणारे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

    चित्रा वाघ यांचा घणाघात

    या प्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत भूमिका मांडली आहे. महिलांच्या सुरक्षेवर राजकारण नाहीच पण राजकीय संरक्षण खपवून घेणार नाही. अहिल्यानगरमधील शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर असलेल्या अभिषेक कळमकरने जे काळं कृत्य केलं त्याला माफी नाही. त्याला कायद्यानुसार शिक्षा होईलच. पण आज माझा थेट प्रश्न १२ मतीच्या मोठ्ठ्या ताईंना आहे. महिलांच्या सन्मानावर मोठमोठी भाषणं करणाऱ्या आज गप्प का? त्या नराधमाला तुमच्या पक्षातून तात्काळ बडतर्फ करणार नाही का? लक्षात ठेवा मौन हे देखील सहकार्यासारखंच असतं. हा फक्त एका मुलीचा प्रश्न नाही. हा महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. त्यांनी अप्रत्यक्षपणे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्ष नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले असून आरोपीवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

    तपासावर सर्वांचे लक्ष

    या प्रकरणात सध्या एकच व्हिडिओ समोर आला असला तरी आरोपीच्या मोबाईलमधून आणखी धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त होत आहे. पोलीस तपासातून या प्रकरणाचे संपूर्ण सत्य उघड होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अहिल्यानगर प्रकरणात पुढे काय उलगडणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा