• Fri. Mar 6th, 2026

    Akola Crime : रील बनवण्याची हौस पडली 20 लाखांना! मैत्रिणीनेच रचला चोरीचा कट; अकोला पोलिसांची मोठी कारवाई

    Akola Crime : रील बनवण्याची हौस पडली 20 लाखांना! मैत्रिणीनेच रचला चोरीचा कट; अकोला पोलिसांची मोठी कारवाई

    रील बनवण्याच्या नादात आपण काय करतोय याचं देखील आपल्याला भान राहिलेलं नाही, असं म्हणायला हरकत नाही. कारण अकोल्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला रील बनवण्याची हौस ही चक्क 20 लाख रुपयांत पडली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रियंका जाधव, अकोला : सध्या सोशल मीडियावर ‘रील’ (Reel) बनवण्याचे वेड तरुणाईपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच लागले आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवतात. मात्र, अकोला शहरात रील बनवण्याच्या नादात एका महिलेला तब्बल २० लाख रुपयांचा फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, ज्या मैत्रिणीसोबत रील बनवली, तिनेच विश्वासघात करत या चोरीचा डाव साधला.

    नेमकी घटना काय?

    अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ फेब्रुवारी रोजी एका घरातून १९ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ९० हजार रुपयांची रोकड चोरीला गेली होती. फिर्यादी महिलेने याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या ९ दिवसांत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला असून, तपासात जे समोर आले ते ऐकून पोलीसही थक्क झाले.फिर्यादी महिला आणि आरोपी महिला या शेजारीच राहतात. काही दिवसांपूर्वीच त्यांची मैत्री झाली होती. आरोपी महिलेने हळूहळू फिर्यादीचा विश्वास संपादन केला. दोघींनाही रील बनवण्याची आवड असल्याने त्या एकत्र व्हिडिओ बनवत असत. घटनेच्या दिवशी आरोपी महिलेने रील बनवण्याच्या बहाण्याने फिर्यादीला आपल्या घरी बोलावले. रील शूट करताना फिर्यादीचे लक्ष विचलित झाले असल्याचे पाहून, आरोपीने फिर्यादीच्या घरातील कपाटातून २० लाखांचे दागिने आणि रोकड लंपास केली.

    पोलिसांकडून चपळाईने मुद्देमाल जप्त

    चोरी केल्यानंतर आरोपी महिलेने हा सर्व ऐवज आपल्या तीन मित्रांकडे लपवून ठेवला होता. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयित महिलेसह तिच्या साथीदारांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी अखेर गुन्ह्याची कबुली दिली. जुने शहर पोलिसांनी या कारवाईत चोरीला गेलेला संपूर्ण २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका महिलेसह तिच्या तीन पुरुष साथीदारांना अटक करण्यात आली असून, पोलीस त्यांची अधिक चौकशी करत आहेत. सोशल मीडियाच्या नादात अनोळखी किंवा नवीन ओळख झालेल्या व्यक्तींवर आंधळा विश्वास ठेवणे किती महागात पडू शकते, हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा