• Wed. Mar 11th, 2026
    Buldhana Crime : कॉलेजमध्ये ओळख, 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये, लग्नाचं आमिष अन्…, पीडित तरुणीची पोलीस ठाण्यात धाव

    बुलढाण्यात प्रेमात विश्वासघाताचं एक प्रकरण समोर आलं आहे. लग्नाचं आमिष दाखवून तरुणीसोबत आरोपी हा चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिला. पण नंतर त्याने लग्नाला नकार दिला. यामुळे पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    बुलढाणा : स्त्रियांबाबत कितीही सरकारकडून सुरक्षिततेचे कायदे आणले तरी देखील त्यांच्या अडचणी किंवा त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. असाच काहीसा प्रकार बुलढाण्यात समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षे तरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

    कॉलेजमध्ये ओळख, नंतर विश्वासघात

    मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही 2021 मध्ये अकोला येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. त्याच कालावधीत तिची ओळख त्याच कॉलेजमध्ये बी.एससी. नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या आरोपीसोबत झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला.

    लॉजवर नेऊन जबरदस्तीने संबंध

    फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला शेगाव येथील लॉज येथे नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नाचे आश्वासन दिल्यामुळे तरुणीने आरोपीवर विश्वास ठेवला. यानंतर आरोपी आणि फिर्यादी हे जवळपास चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. या कालावधीत आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप फिर्यादीने केला आहे.

    लग्नास नकार; पोलिसांत गुन्हा दाखल

    नोव्हेंबर 2025 नंतर आरोपीने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे पीडित तरुणीने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी CCINS प्रणालीद्वारे ऑनलाईन FIR प्राप्त झाली असून शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षकांकडे

    सदर FIR वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा