Bhiwandi Mayor Election : महापौरपदाच्या निवडणुकीत ४८ मतं मिळवत भिवंडी सेक्युलर फ्रंटचे उमेदवार असलेले ‘भाजप बंडखोर’ नारायण चौधरी विजयी झाले
महापौर पदाच्या निवडणुकीत काय झालं?
भिवंडी महापालिका निवडणुकीत महायुतीत फूट पडल्यानंतर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. अशातच भारतीय जनता पक्षाकडून महापौरपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या नारायण चौधरी यांनी उमेदवारी न मिळाल्याने भिवंडी सेक्युलर फ्रंटसोबत जाण्याचा निर्णय घेत खळबळ उडवून दिली होती. त्यांना पक्षातील सहा नगरेसवकांचा पाठिंबा असल्यामुळे भाजपमध्ये फूट पडल्याची चर्चा होती. तर भिवंडी सेक्युलर फ्रंटमधील काँग्रेसचे मोमीन तारिक अब्दुल बारी हे महापौरपदासह उपमहापौरपदासाठीही अर्ज भरुन रिंगणात होते.
Rajya Sabha Election : शरद पवार भाजपसोबत जाण्याची भीती, राज्यसभेवर पाठवण्यास काँग्रेसमधून विरोधाचा सूर, एकमेव जागेवर कोणाला संधी?
सहा जणांची माघार, तिघे रिंगणात
भिवंडी महापालिकेत विशेष सभेच्या सुरुवातीलाच महापौरपदासाठी रिंगणात उतरलेल्या शिवसेनेच्या बाळाराम चौधरी, सुचिता म्हात्रे यांच्यासह ६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तिघे जण रिंगणात उरले. यामध्ये भाजपच्या स्नेहा पाटील, भिवंडी सेक्युलर फ्रंटचे नारायण चौधरी, तसेच कोणार्क विकास आघाडीचे नेते विलास पाटील यांचा समावेश होता. महापौरपदासाठी हात वर करुन मतदानाची प्रक्रिया झाली असता ४८ मतं मिळवत चौधरींनी महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. भाजपचे एकूण सहा नगरसेवक नारायण चौधरी यांच्यासोबत आले आहेत. ते ६ नगरसेवक, काँग्रेसचे ३० आणि राष्ट्रवादी शप १२ अशी एकूण ४८ मतं चौधरी यांना मिळाली.भाजपच्या स्नेहा पाटील यांना अवघ्या १६ मतांवर समाधान मानावं लागलं. तर कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांच्या बाजूने शिवसेनेच्या १२ आणि सपच्या सहा नगरसेवकांनी मतदान केलं. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेत कोणार्कला पाठिंबा दिला.
Madhuri Manjrekar : शेवटच्या क्षणी BMC चं तिकीट नाकारल्याने ढसाढसा रडलेल्या, पण दीड महिन्यात ठाकरेंकडून बक्षिसी, माधुरी मांजरेकर म्हणतात…
विलास पाटील अटकेत
महापौर निवडणुकीच्या तोंडावरच माजी महापौर असलेल्या आणि यंदाही रिंगणात उतरलेल्या विलास पाटील यांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या वर्षीच्या एका फसवणुकीच्या प्रकरणात अटक केल्याने खळबळ उडाली होती. महापौरपदाच्या निवडणुकीत पाटील किंगमेकर ठरत निर्णायक भूमिका बजावण्याच्या शक्यतेमुळे सगळी चक्रं फिरली होती. अखेर निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्तात विलास पाटील यांना महापालिकेत आणण्यात आले.
कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, कर्मचाऱ्यांना महापौर सय्यद इकबाल यांचा इशारा
