• Sat. Mar 7th, 2026

    लग्नपत्रिकेवरुन वाद उफाळला, भावकीच्या भांडणातून हळदीतच तिघांना संपवलं, व्हॉट्सअप स्टेटसमुळे वेगळाच संशय

    लग्नपत्रिकेवरुन वाद उफाळला, भावकीच्या भांडणातून हळदीतच तिघांना संपवलं, व्हॉट्सअप स्टेटसमुळे वेगळाच संशय

    Dhule Haldi Ceremony Attack : हल्लेखोरांनी काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲप स्टेटसवर ठार मारण्याची धमकी दिली होती, असा दावा अशोक गिरी यांनी केला

    धुळ्यात हळदीत हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, धुळे : जिल्ह्यातील पिंपळनेर येथील नीलकंठनगर परिसरात जुन्या वादातून आणि लग्नपत्रिकेतील नावाच्या वादातून गोसावी समाजातील भाऊबंधकीमधील दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या संघर्षात धारदार शस्त्राने केलेल्या हल्यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे धुळे जिल्हा हादरला आहे. हल्ल्यातील मृतांमध्ये देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (वय ३५), सुरेश मोजगीर गोसावी (५५) आणि साहिल सुरेश गोसावी (वय २२) यांचा समावेश आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

    काय झालं नेमकं?

    पिंपळनेर शहरातील नीलकंठ- नगरमध्ये राहणारे विजय गोसावी यांच्या मुलीच्या लग्नाचा साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम गुरुवारी दुपारच्या सुमारास सुरू होता. सर्व नातेवाईक एकत्र जमले होते. मात्र, दुपारी अचानक दोन गट आमनेसामने आले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात हल्लेखोरांनी कुऱ्हाड आणि चाकूसारख्या धारदार शस्त्रांनी समोरच्या व्यक्तींवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. मंडपात रक्ताचा सडा पडला.
    Maharashtra TimesHiLITE Group : मालक असावा तर असा! कंपनीकडून 47 कर्मचाऱ्यांना 20 कोटींच्या आलिशान गाड्या भेट; ऑडी, रेंज रोव्हर ते स्कोडा कारची खैरात
    हल्ल्यात गंभीर जखमी झालेले देवेंद्र पवार, सुरेश गोसावी आणि साहिल गोसावी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान या तिघांचाही मृत्यू झाला. पंकज अशोकगीर गोसावी, सुरेश सुपडूगीर गोसावी आणि सागर गोसावी गंभीर जखमी असून, यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

    Raj Thackeray | न पाहिलेली मुंबई पाहिली, शेतकरी पत्नींनी साधला राज ठाकरेंशी संवाद

    तिघांना अटक

    या घटनेनंतर पिंपळनेर पोलिसांनी तीन आरोपींना ओटाबारी येथे अटक केली. कांतीलाल गोसावी, जयंत गोसावी आणि ब्रिझा कारचा चालक (सर्व रा. गुजरात) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी कानागिरी गोसावी, यशवंत गोसावी, अनिलगिरी गोसावी, सोनुगिरी गोसावी आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Maharashtra TimesPune Crime : कात्रजला जायचंय, रिक्षा इथे का नेता? वादावादीत महिलेला संपवलं, पोलिसांनी 97 सीसीटीव्ही फूटेज तपासले, अखेर गूढ उकललंच
    हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे. हल्लेखोरांनी काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲप स्टेटसवर ठार मारण्याची धमकी दिली होती, असा दावा अशोक गिरी यांनी केला आहे. ही धमकी गांभीर्याने घेतली असती तर कदाचित आज हा भीषण रक्तपात झाला नसता, अशी भावना व्यक्त होत आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा