• Sat. Jun 20th, 2026
    Kolhapur News : शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात संतापजनक कृत्य, शिवपुतळ्यासमोर पडदा लावून अश्लील नृत्य; नेमका प्रकार काय?

    Kolhapur Crime News : याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रेमी संघटना करीत आहेत. वडणगे गाव हे ऐतिहासिक आणि प्राचीन महाशिवरात्रीला शंकर-पार्वती यात्रेसाठी प्रसिद्ध असले तरी अशा घटनेमुळे गावाची प्रतिमा डागाळली गेली आहे.

    कोल्हापूर वडणगे ग्रामपंचायत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह राज्यभर पसरला असताना, कोल्हापुरात करवीर तालुक्यातील वडणगे ग्रामपंचायतीने हा उत्सव कलंकित करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित यात्रेदरम्यान ग्रामपंचायत इमारतीसमोर शिवरायांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून अश्लील नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून, ग्रामस्थांच्या अनभिज्ञतेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

    पुतळ्यासमोर धिंगाणा; ग्रामस्थांना कळेना

    बुधवारी (18 फेब्रुवारी) रात्री उशिरा पार पडलेल्या नृत्याच्या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत इमारतीच्या दर्शनी भागात स्टेज उभारण्यात आले होता. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून मध्येच लावणीच्या नावाखाली आइटम सॉंगवर बिभित्स नृत्य सुरू झाले. महाशिवरात्र यात्रेच्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते, परंतु भजन-कीर्तन किंवा सत्संगाची अपेक्षा असताना असा कार्यक्रम कोणत्या उद्देशाने ठेवला, असा सवाल शिवप्रेमी उपस्थित करत आहेत.
    Maharashtra TimesKolhapur Acccident : आईची तब्येत बघायला जाताना काळाची झडप, धोकादायक वळणार ट्रकची धडक; चिमुकलीसह आई-वडिलांचा करुण अंत

    वडणगे ग्रामपंचायतीचा वादग्रस्त इतिहास

    वडणगे ग्रामपंचायत पूर्वीही विविध वादात सापडली आहे. गेल्या वर्षी बेकायदा बैलगाडी शर्यतीमुळे सरपंचांसह कार्यकारिणीवर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी डांबरी रस्त्यावर शर्यत घेताना एका बैलाचा मृत्यू झाला होता. आदल्या वर्षी शर्यतीवरून दोन गटांत हाणामारी होऊन गुन्हे नोंदले गेले. तरीही ग्रामपंचायतीच्या वागणुकीत कोणताही सुधारणा झालेली नाही, असे स्थानिक सुज्ञ नागरिक सांगतात. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
    Maharashtra TimesPune Crime: पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना; अंगणात खेळणाऱ्या 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, संध्याकाळी ताप आल्यानंतर…

    शिवभक्तांचा संताप; राजकीय आशिर्वादाचा संशय

    “शिवजयंतीच्या तोंडावर पुतळ्यासमोर पडदा लावून असे कार्यक्रम कसे चालवता येतील? हे राजकीय नेत्यांचा आशिर्वाद असल्याशिवाय शक्य नाही,” अशी भावना शिवभक्तांनी व्यक्त केली आहे. मागील 3-4 वर्षांपासून ग्रामपंचायत इमारतीसमोर असे कार्यक्रम होत असल्याचेही सांगितले जाते. टीपू सुलतान आणि शिवरायांच्या तुलनेवरून राज्यात तणाव असताना असा प्रकार होणे अत्यंत असंयुक्तिक आहे. निदान दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम घेता आला असता, असे मत सुज्ञ नागरिकांनी मांडले आहे.

    कुणीतरी मुद्दाम खोडसाळपणा केल्याचा खुलासा

    या प्रकरणी वडणगे ग्रामपंचायतीने स्पष्टीकरण देत खुलासा केला की, महाशिवरात्री यात्रेनिमित्त परंपरेनुसार ग्रामपंचायत कार्यालयासमोर पटांगणात कार्यक्रम आयोजित केला होता, तर शिवरायांचा पुतळा स्टेजमागे असणाऱ्या ग्रामपंचायत इमारतीच्या आत असल्याने शटर ओढून पडदा लावण्यात आला होता आणि त्यामुळे अवमानाचा प्रश्नच उद्भवत नाही; ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश ठाणेकर, माजी सरपंच सचिन चौगुले आणि उपसरपंच जयवंत कुंभार यांनी व्हिडिओमध्ये पुतळा दिसत नसल्याचे सांगत, चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    दुसरीकडे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या भूमिकेचे समर्थन करत वडणगे गाव कट्टर शिवभक्तांचे असल्याचे सांगितले. तसेच हा कार्यक्रम गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी आयोजित केला होता, जाणीवपूर्वक व्हिडीओ व्हायरल करून गावची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे ग्रामस्थांनी ठरवले. दरम्यान याप्रकरणी ग्रामपंचायत प्रशासनाने कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही केले आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा