• Fri. Mar 6th, 2026

    Dhule Crime : आनंदाचं वातावरण क्षणार्धात दु:खात बदललं, धुळ्यात लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमाला गालबोट, भांडणात तिघांचा मृत्यू

    Dhule Crime : आनंदाचं वातावरण क्षणार्धात दु:खात बदललं, धुळ्यात लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमाला गालबोट, भांडणात तिघांचा मृत्यू

    धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे एका लग्न समारंभात धक्कादायक घटना घडली आहे. हळदीच्या दिवशी नवरदेव आणि नवरीकडच्या नातेवाईकांमध्ये किरकोळ कारणावरुन मोठा वाद उफाळला. या वादात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अजय गर्दे, धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका कौटुंबिक विवाह समारंभ प्रसंगी दोन गटात वाद झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या वादातून धारदार शस्त्राने वार केल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. तर दोन ते तीन जण गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. या घटनेत सोनू गोसावी, देवेंद्र पवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर साई गोसावी यांचा धुळ्यात खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सोनगड येथील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

    पिंपळनेर येथे आनंदोत्सवासाठी जमलेले लग्नघर अचानक भीषण हिंसाचाराने हादरले. पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात गोसावी समाजाच्या लग्न कार्यादरम्यान धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे आणि चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता. साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडिओ प्रसारित केल्याने तणाव अधिक वाढला. याच वादातून लग्नस्थळी अचानक कुरापत काढत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे. या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (वय ३५), सुरेशगीर मोजगीर गोसावी (वय ५५) आणि साहील सुरेश गोसावी (वय २२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    तसेच साहिल सुरेश गोसावी, पंकज अशोक गीर, सुरेश सुपडू गीर आणि सागर गोसावी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींपैकी एकास पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

    या प्रकरणी कानागिरी मुलागिरी गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, अनिल गिरी हटुगिरी गोसावी, सोनुगिरी गोसावी, विजुगिरी हटुगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभू गिरी गोसावी आणि हर्ष शंभू गोसावी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. लग्न सोहळ्यातील या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा